होनकलजवळ अपघातात एक ठार

होनकलजवळ अपघातात एक ठार

सहाजण जखमी : मृत बागलकोट येथील
खानापूर : बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूर तालुक्यातील होनकलजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसयूव्ही हे वाहन पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमींना अधिक उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बागलकोट येथील देशपांडे कुटुंबीय उळवी येथील नातेवाईकांच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर उळवी येथील देवस्थानचे दर्शन आटोपून पुन्हा बागलकोटकडे निघताना खानापूरजवळील होनकल येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एसयूव्ही-700 केए 29 एम 7234 हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळून पुलावरून खाली कोसळले. या अपघातात वाहनातील कृष्णा श्रीनिवास देशपांडे (वय 72) हे जागीच ठार झाले आहेत. तर राधिका देशपांडे (वय 64), सागर कृष्णा देशपांडे (वय 30), अनंत शामराव फडणवीस (वय 52), स्वाती आनंद फडणवीस (वय 48) हे सर्व राहणार बागलकोट, मुधोळ तसेच शिल्पा संजय देशपांडे (वय 36), सान्वी संजय देशपांडे (वय 10), संचिता संजय देशपांडे (वय 5) राहणार मंगळवारपेठ, बेळगाव यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. कृष्णा देशपांडे हे हायकोर्टचे नामांकित वकील होते. बेळगाव येथील नामांकित कॉलेजमधील प्रोफेसर संजय देशपांडे यांचे ते वडील होत.