येवल्यात पतीकडून प्राणघातक हल्ल्यात पत्नीचा खून

दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे येवला शहरातील गंगा दरवाजा लक्ष्मी आई मंदिर कोटमगाव रोड परिसरात पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

येवल्यात पतीकडून प्राणघातक हल्ल्यात पत्नीचा खून

येवला  :- दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे येवला शहरातील गंगा दरवाजा लक्ष्मी आई मंदिर कोटमगाव रोड परिसरात पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बाळू शंकर जाधव वय 30 याने आपली पत्नी अर्चना बाळू जाधव हिच्यावर धारदार शस्त्राने मानेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. परिसरातील नागरिकांनी अर्चना जाधव हिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल केले. मात्र अर्चनाची प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले होते.

तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. यानंतर येवला शहर पोलिसांनी संशयित आरोपी बाळू शंकर जाधव याला ताब्यात घेतले असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी भेट दिली असून येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे येवला शहरातील गंगा दरवाजा लक्ष्मी आई मंदिर कोटमगाव रोड परिसरात पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Go to Source