मुंबईकरांनो लक्ष द्या! पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प

ठाण्यानंतर आता दादर व मुंबईतही (Mumbai) वादळी वाऱ्याचे आगमन झाले असून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, वादळी सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई मेट्रोही (Metro) ठप्प झाल्याची माहिती आहे.  मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वारं सुटलं असून हवामान ढगाळ झालं आहे. पुढील काही तासांत येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, वातावरण फिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. टॅक्सी, ऑटो व वाहनचालकांनीही जागेवर थांबा केल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्याने मुंबई मेट्रोचा खोळंबा झाला आहे.  एअरपोर्ट रोड स्टेशनवरवर ही मेट्रो थांबली आहे, वादळी वाऱ्यामुळे बॅनर पडल्याने घाटकोपर-वर्सोवो मेट्रो ठप्प झाली. मेट्रो प्रशासनाकडून हा बॅनर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटकोपर येथून वर्सोवा मार्गावर धावणारी ही मेट्रो जागेवर थांबली आहे. त्यामुळे, प्रवाशी खोळंबले असून एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरच अडकून पडले आहेत.  दरम्यान, विमानसेवेरही या वादळी वाऱ्याचा परिणाम झाला असून काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आले असून वेळेतही बदल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग), हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात ढगाळ वातावरण झालं असून जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर कल्याण, डोंबिवलीत धुळीसह जोरदार वारा वाहत असून काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. हेही वाचा बीएमसीच्या मान्सूनपूर्व मोहिमेत 1,644 डेंग्यू हॉटस्पॉट्स आढळले

मुंबईकरांनो लक्ष द्या! पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प

ठाण्यानंतर आता दादर व मुंबईतही (Mumbai) वादळी वाऱ्याचे आगमन झाले असून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच, वादळी सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई मेट्रोही (Metro) ठप्प झाल्याची माहिती आहे. मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वारं सुटलं असून हवामान ढगाळ झालं आहे. पुढील काही तासांत येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, वातावरण फिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. टॅक्सी, ऑटो व वाहनचालकांनीही जागेवर थांबा केल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्याने मुंबई मेट्रोचा खोळंबा झाला आहे. एअरपोर्ट रोड स्टेशनवरवर ही मेट्रो थांबली आहे, वादळी वाऱ्यामुळे बॅनर पडल्याने घाटकोपर-वर्सोवो मेट्रो ठप्प झाली. मेट्रो प्रशासनाकडून हा बॅनर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटकोपर येथून वर्सोवा मार्गावर धावणारी ही मेट्रो जागेवर थांबली आहे. त्यामुळे, प्रवाशी खोळंबले असून एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरच अडकून पडले आहेत.  दरम्यान, विमानसेवेरही या वादळी वाऱ्याचा परिणाम झाला असून काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आले असून वेळेतही बदल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग), हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात ढगाळ वातावरण झालं असून जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे.बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर कल्याण, डोंबिवलीत धुळीसह जोरदार वारा वाहत असून काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. हेही वाचाबीएमसीच्या मान्सूनपूर्व मोहिमेत 1,644 डेंग्यू हॉटस्पॉट्स आढळले

Go to Source