मान्सून आज केरळात

मान्सून आज केरळात

वाऱ्यांनाही मिळाली बळकटी : मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती
पुणे : नैर्त्रुत्य मोसमी वारे अर्थात मान्सून केरळ तसेच पूर्वोत्तर भारतामध्ये गुऊवारी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस होत आहे. वाऱ्यांनाही बळकटी मिळाली आहे. त्यामुळे मान्सूनसाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सून यंदा नियोजित वेळेच्या तीन दिवस आधीच अंदमान बेटावर दाखल झाला आहे. त्यानंतर त्याच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुऊवात झाली आहे. बुधवारी मान्सून अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकला सर्वसाधारणपणे मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये येतो. पण यंदा तो 31 मेपर्यंत दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रेमल वादळानंतर मान्सून मध्य अरबी समुद्रापर्यंत पुढे सरकला असून बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग व्यापला आहे.
देशात उष्णतेने मोडला रेकॉर्ड : राजस्थानात चुरू येथे 50.5 अंश सेल्सिअस : राजधानीही तप्त
देशाच्या वायव्य तसेच उत्तर भारतात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेने आता नवा रेकॉर्ड नोंदविला आहे. राजस्थानातील चुरू येथे मंगळवारी 50.5 अंश सेल्सिअस इतक्या आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर राजधानी दिल्लीतही उष्णनेते 52 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केल्याचा दावाही केला जात आहे. एल निनो तसेच जागतिक तापमानवाढ यामुळे यंदाचा उन्हाळा कडक राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार एप्रिल तसेच मे महिना अक्षरश: भाजून निघाला आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र्र, तेलंगणा, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागात उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. यातील राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीमध्ये अतितीव्र उष्णतेची लाट अर्थात रेड अलर्ट सुरूच आहे. या भागातील शहरे दिवसेंदिवस आता नवीन उच्चांक गाठत आहेत. त्यातच फलुदी (49), बारमेर, चुऊ (50.5), बिकानेर (48.3), कोटा (48.2), गंगानगर (49.4), जैसलमेर (48), पिलानी (49) यात आघाडीवर आहेत. मे महिन्याच्या सुऊवातीपासूनच देशाच्या वायव्य भागात उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच राजधानी दिल्लीत गेले अनेक दिवस रेड अलर्ट आहे.
थंड हवेची ठिकाणेही तापली
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागातील कमाल व किमान तापमानातही यंदा वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे उष्णतेची लाट यंदा जाणवत आहे.