मोदींनी 90 रुपयांचे नाणे केले लाँच

90 व्या वर्धापनदिनानिमित्त, आरबीआयने सोमवारी म्हणजेच 1 एप्रिल रोजी 90 रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी केले आहे. असे नाणे प्रथमच जारी करण्यात आले आहे.

मोदींनी 90 रुपयांचे नाणे केले लाँच

90 व्या वर्धापनदिनानिमित्त, आरबीआयने सोमवारी म्हणजेच 1 एप्रिल रोजी 90 रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी केले आहे. असे नाणे प्रथमच जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुद्ध चांदीचे 40 ग्रॅम वजनाचे नाणे जारी केले.

 

या स्मरणार्थी नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 90 रुपयांचे मूल्य लिहिलेले आहे. तसेच, त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेले असणार. त्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि लोगोच्या वरच्या परिमितीवर हिंदीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खालच्या परिमितीवर इंग्रजीमध्ये लिहिलेले आहे. लोगोच्या खाली RBI@90 असे लिहिले आहे.

 

 या 90 रुपयांच्या नाण्याचे वजन 40 ग्रॅम आहे, जे 999 शुद्ध चांदीपासून बनलेले आहे. याआधीही 1985 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण जयंती आणि 2010 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम ज्युबिलीवर स्मारक नाणी जारी करण्यात आली आहेत.या 90 रुपयांच्या नाण्याचे अनावरण केल्यानंतर, हे नाणे दर्शनी मूल्यापेक्षा अधिक प्रीमियमने विकले जाईल.

 

या नाण्याची अंदाजे किंमत सुमारे 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्राहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्साह आहे. 19 मार्च 2024 रोजी, आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती.

आरबीआय च्या RBI च्या 90 वर्षांच्या कार्याचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी RBI ची भूमिका खूप महत्वाची आणि मोठी आहे. आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source