मेट्रो 3 ऑपरेशनची अंतिम तारीख अद्याप निश्चित नाही : MMRCL
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL)ने मेट्रो 3 चा टप्पा 1 किंवा एक्वा लाइन कार्यान्वित करण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. आरे कॉलनी (Arey Collany) आणि BKC दरम्यान मेट्रो 3च्या फेज 1 चे ऑपरेशनसाठी सर्व प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सुरू होईल. पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर, कुलाबा ते SEEPZ दरम्यान एक्वा लाइन धावेल.“आम्ही मेट्रो 3 चे ऑपरेशन सुरू करण्याची तारीख निश्चित केलेली नाही. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) कडून तपासणी होणे बाकी आहे. CMRS ची परवानगी मिळाल्यानंतरच सेवा सुरू करण्याची तारीख ठरवली जाईल. या महिन्यात एमएमआरसीएल सीएमआरएसला तपासणीसाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे,” असे एका एमएमआरसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.“आम्ही 99% प्रशासकीय कामे पूर्ण केली आहेत तर मेट्रो स्टेशन बांधण्याचे काम 97% पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, एकूण प्रणालीचे काम 77.6% पूर्ण झाले आहे, डेपोतील सिव्हिल कामे 99.8% पूर्ण झाली आहेत आणि मेनलाइन ट्रॅकचे काम 87% पूर्ण झाले आहे,” अधिकारी पुढे म्हणाले.मेट्रो 3 कुलाबा-वांद्रे-SEEPZ या बाजूने चालणारा 33.5-किमी लांबीचा भूमिगत कॉरिडॉर आहे. रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO), इंडिपेंडेंट सेफ्टी ऍक्सेसर (ISA), कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) यांसारखे अनेक स्तर आहेत. “RDSO ने तपासणी पूर्ण केली आहे आणि ISA तपासणी सध्या चालू असताना प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे,” अधिकारी म्हणाला.MMRCLच्या ताफ्यात सध्या 19 रेक आहेत, जे भूमिगत मेट्रो कॉरिडॉरचा टप्पा 1 चालवण्यासाठी पुरेसे आहेत. एकदा तयार झाल्यानंतर, 260 सेवा दररोज अंदाजे 17 लाख प्रवाशांना सेवा पुरवतील. MMRCL स्थानकांच्या मल्टी-मॉडल इंटिग्रेशनवर देखील काम करत आहे. ज्यामध्ये शेवटच्या मैलापर्यंत सार्वजनिक वाहतुकीच्या इतर पद्धतींसह कनेक्टिव्हिटी, स्थानकाबाहेरील चांगले फूटपाथ, आसनव्यवस्था आणि आवश्यक तेथे फूट ओव्हर ब्रिज यांचा समावेश असेल.अलीकडेच, भारत सरकारने जपानी इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) सोबत पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील कर्ज करारावर स्वाक्षरी करून प्रकल्पाच्या निधीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. 29 फेब्रुवारी 2024 रोजी भारत सरकारच्या मान्यतेनुसार, मुंबई मेट्रो लाईन-3 ची सुधारित प्रकल्प किंमत 37,276 कोटी आहे. 57.09% JICA कर्जाची रक्कम 21,280 कोटी आहे. JICA कर्ज करार, 84 अब्ज जपानी येन (रु. 4657 कोटी) मेट्रो लाइन 3 प्रकल्पासाठी निधी पूर्ण करतो. पहिल्या टप्प्यावर 17 सप्टेंबर 2013 रोजी स्वाक्षरी झाली.मेट्रो ३ वरील स्थानके:कफ परेड विधानभवन चर्चगेटहुतात्मा चौकसीएसटी मेट्रोकाळबादेवीगिरगावग्रँट रोडमुंबई सेंट्रल मेट्रोमहालक्ष्मीविज्ञान संग्रहालयआचार्य अत्रे चौकवरळीसिद्धिविनायकदादरसीतलादेवीधारावीबीकेसीविद्यानगरीसांताक्रूझदेशांतर्गत विमानतळसहार रोडआंतरराष्ट्रीय विमानतळमरोळ नाकाएमआयडीसी SEEPZ आरे डेपोहेही वाचामोनोरेलच्या प्रवासी संख्येत सोमवारी 30% वाढ
मध्य रेल्वेच्या आषाढी यात्रेसाठी 64 विशेष गाड्या
Home महत्वाची बातमी मेट्रो 3 ऑपरेशनची अंतिम तारीख अद्याप निश्चित नाही : MMRCL
मेट्रो 3 ऑपरेशनची अंतिम तारीख अद्याप निश्चित नाही : MMRCL
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL)ने मेट्रो 3 चा टप्पा 1 किंवा एक्वा लाइन कार्यान्वित करण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. आरे कॉलनी (Arey Collany) आणि BKC दरम्यान मेट्रो 3च्या फेज 1 चे ऑपरेशनसाठी सर्व प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सुरू होईल. पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर, कुलाबा ते SEEPZ दरम्यान एक्वा लाइन धावेल.
“आम्ही मेट्रो 3 चे ऑपरेशन सुरू करण्याची तारीख निश्चित केलेली नाही. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) कडून तपासणी होणे बाकी आहे. CMRS ची परवानगी मिळाल्यानंतरच सेवा सुरू करण्याची तारीख ठरवली जाईल. या महिन्यात एमएमआरसीएल सीएमआरएसला तपासणीसाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे,” असे एका एमएमआरसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
“आम्ही 99% प्रशासकीय कामे पूर्ण केली आहेत तर मेट्रो स्टेशन बांधण्याचे काम 97% पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, एकूण प्रणालीचे काम 77.6% पूर्ण झाले आहे, डेपोतील सिव्हिल कामे 99.8% पूर्ण झाली आहेत आणि मेनलाइन ट्रॅकचे काम 87% पूर्ण झाले आहे,” अधिकारी पुढे म्हणाले.
मेट्रो 3 कुलाबा-वांद्रे-SEEPZ या बाजूने चालणारा 33.5-किमी लांबीचा भूमिगत कॉरिडॉर आहे. रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO), इंडिपेंडेंट सेफ्टी ऍक्सेसर (ISA), कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) यांसारखे अनेक स्तर आहेत. “RDSO ने तपासणी पूर्ण केली आहे आणि ISA तपासणी सध्या चालू असताना प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे,” अधिकारी म्हणाला.
MMRCLच्या ताफ्यात सध्या 19 रेक आहेत, जे भूमिगत मेट्रो कॉरिडॉरचा टप्पा 1 चालवण्यासाठी पुरेसे आहेत. एकदा तयार झाल्यानंतर, 260 सेवा दररोज अंदाजे 17 लाख प्रवाशांना सेवा पुरवतील. MMRCL स्थानकांच्या मल्टी-मॉडल इंटिग्रेशनवर देखील काम करत आहे. ज्यामध्ये शेवटच्या मैलापर्यंत सार्वजनिक वाहतुकीच्या इतर पद्धतींसह कनेक्टिव्हिटी, स्थानकाबाहेरील चांगले फूटपाथ, आसनव्यवस्था आणि आवश्यक तेथे फूट ओव्हर ब्रिज यांचा समावेश असेल.
अलीकडेच, भारत सरकारने जपानी इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) सोबत पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील कर्ज करारावर स्वाक्षरी करून प्रकल्पाच्या निधीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
29 फेब्रुवारी 2024 रोजी भारत सरकारच्या मान्यतेनुसार, मुंबई मेट्रो लाईन-3 ची सुधारित प्रकल्प किंमत 37,276 कोटी आहे. 57.09% JICA कर्जाची रक्कम 21,280 कोटी आहे. JICA कर्ज करार, 84 अब्ज जपानी येन (रु. 4657 कोटी) मेट्रो लाइन 3 प्रकल्पासाठी निधी पूर्ण करतो. पहिल्या टप्प्यावर 17 सप्टेंबर 2013 रोजी स्वाक्षरी झाली.
मेट्रो ३ वरील स्थानके:कफ परेड
विधानभवन
चर्चगेट
हुतात्मा चौक
सीएसटी मेट्रो
काळबादेवी
गिरगाव
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल मेट्रो
महालक्ष्मी
विज्ञान संग्रहालय
आचार्य अत्रे चौक
वरळी
सिद्धिविनायक
दादर
सीतलादेवी
धारावी
बीकेसी
विद्यानगरी
सांताक्रूझ
देशांतर्गत विमानतळ
सहार रोड
आंतरराष्ट्रीय विमानतळ
मरोळ नाका
एमआयडीसी
SEEPZ
आरे डेपोहेही वाचा
मोनोरेलच्या प्रवासी संख्येत सोमवारी 30% वाढमध्य रेल्वेच्या आषाढी यात्रेसाठी 64 विशेष गाड्या