समितीच्या पुनर्रचनेत तरुणांना अधिक प्राधान्य द्या

समितीच्या पुनर्रचनेत तरुणांना अधिक प्राधान्य द्या

बोकनूर – राकसकोप परिसरात समितीच्या गाव संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर /किणये
सीमाप्रश्नाचा लढा गावागावांतील तरुणांना माहित व्हावा, तसेच तालुकामय समितीच्या पुनर्रचनेसाठी गावागावातील तरुण व महिलांची यादी तयार करण्याची यादी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची गावसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून समितीच्या पुनर्रचनेत तरुणांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे मनोगत म. ए. समितीचे युवा कार्यकर्ते नारायण सावगावकर यांनी बोकनूर येथे व्यक्त केले.
बोकनूर व राकसकोप गावामध्ये समितीच्या नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांची नुकतीच भेट घेऊन गाव संपर्क अभियानासंदर्भात माहिती दिली. बोकनूर गावातील बैठकीला उपस्थित असताना नारायण सावगावकर हे बोलत होते. यावेळी परशराम सावगावकर, मल्लाप्पा दळवी, तुळजाराम गोजारे, कृष्णा पाटील, बालाजी पाटील, यल्लाप्पा पाटील, राजू पाटील, यल्लाप्पा शट्टू पाटील, सुनील पाटील, यल्लाप्पा नारायण पाटील, कृष्णा शट्टू पाटील, गुंडू सुतार आदींसह बोकनूर गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सोबत आहोत. यापुढेही समितीच्या झेंड्याखाली कार्य करणारी असल्याची ग्वाही अनेक कार्यकर्त्यांनी दिली.
राकसकोप येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, आर. के. पाटील, आर. एन. चौगुले, मोनाप्पा पाटील, अनिल पाटील, मनोहर हुंदरे आदींनी सीमाप्रश्न व मोहिमेसंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. तसेच यापुढे सीमाप्रश्नाबद्दल कशा पद्धतीने लढा उभारला पाहिजे, याबद्दल माहिती दिली. यावेळी पांडुरंग मोटार, मंगाजी सुकये, दीपक मोटार, नामदेव मोटार, यल्लाप्पा मोटार, विनायक मोरे, बाबाजी पाटील, कृष्णा मोटार, कल्लाप्पा पाटील आदींसह गावकरी उपस्थित होते.