रोप लागवडीसाठी मशागतीची कामे जोरात
बुधवारी पावसाची थोड्या प्रमाणात उसंत : उघडीपीमुळे शेतातील पाणी कमी होण्याची शक्यता
वार्ताहर /किणये
गेल्या दहा बारा दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. यामुळे शेत शिवारामध्ये बऱ्यापैकी पाणी साचले आहे. सध्या भात रोप लागवडीसाठी शेत शिवारात मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत. ही मशागत करण्यासाठी शिवारात पाणी साचणे गरजेचे आहे. मंगळवारी व बुधवारी पावसाने थोड्या प्रमाणात उसंत घेतली. या उघडीपीमुळे शेतातील पाणी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे रोप लागवडीकरिता मशागत करण्यासाठी शेतकरी धडपडताना दिसतो आहे.
तालुक्याच्या पश्चिम व अन्य भागात गेल्या चार दिवसापासून भात रोप लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. काही भागात भात रोप लागवड करण्यासाठी रोपटी तयार नाहीत. त्यांची वाढ अजूनही होणे बाकी आहे. येत्या चार आठ दिवसात सर्रास भागात लागवडीसाठी रोपे तयार होतील, तर काही ठिकाणी आगाऊ बियाणांची पेरणी केलेली रोपे लागवडीसाठी सज्ज आहेत.
मान्सुनच्या प्रारंभी पाऊस झाला नाही. गेल्या दहा-बारा दिवसांपासून दमदार पाऊस झाला. यामुळे नदी-नाले प्रवाहित झालेले आहेत. पाणथळ शिवारामध्ये बऱ्यापैकी पाणी साचले आहे, तर अन्य शिवारामध्ये अजूनही पाणी साचण्याची गरज आहे. तसेच दोन दिवसापासून पावसाने थोड्या प्रमाणात विश्रांती घेतल्यामुळे शेतातील साचलेले पाणी कमी होत असल्यामुळे रोप लागवडीचा हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे.
पॉवर ट्रिलरच्या सहाय्याने मशागत
शिवारात पॉवर ट्रिलरच्या सहाय्याने मशागत करून त्यावर बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करण्यात येत आहे व त्यानंतर भात रोप लागवड करण्यात येऊ लागली आहे. बेळगुंदी, राकसकोप, यळेबैल, बोकनूर, सोनोली, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, कर्ले, बहाद्दरवाडी, किणये, नावगे, वाघवडे, मच्छे, बाळगमट्टी, बामणवाडी आदी शिवारामध्ये शेतकरी रोप लागवडीसाठी मशागत करू लागले आहेत. तसेच शेताच्या बांध्याला लागून असलेले रान काढून टाकण्यात येत आहे. बुधवारी पहाटे पावसाच्या सरी बरसल्या तर दिवसभर पावसाने उघडीप दिली होती.
Home महत्वाची बातमी रोप लागवडीसाठी मशागतीची कामे जोरात
रोप लागवडीसाठी मशागतीची कामे जोरात
बुधवारी पावसाची थोड्या प्रमाणात उसंत : उघडीपीमुळे शेतातील पाणी कमी होण्याची शक्यता वार्ताहर /किणये गेल्या दहा बारा दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. यामुळे शेत शिवारामध्ये बऱ्यापैकी पाणी साचले आहे. सध्या भात रोप लागवडीसाठी शेत शिवारात मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत. ही मशागत करण्यासाठी शिवारात पाणी साचणे गरजेचे आहे. मंगळवारी व बुधवारी पावसाने थोड्या प्रमाणात उसंत घेतली. या उघडीपीमुळे शेतातील पाणी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे […]