विविध शरीरसौष्ठव स्पर्धेत मयुर-आकाशला यश

विविध शरीरसौष्ठव स्पर्धेत मयुर-आकाशला यश

बेळगाव : दावणगेरे व उडुपी येथे झालेल्या कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व उडुपी जिल्हा, दावणगेरे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत येळ्ळूरच्या आकाश जोगानी व मयुर मेणसे यांनी यश संपादन केले आहे. दावणगेरे येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो वजनी गटात आकाश जोगानीने 5 वा क्रमांक तर उडुपी येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत 5 वा क्रमांक पटकावित रोख रक्कम व प्रमाणपत्र मिळविले. होनगा ग्रामीण येथ झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले. 75 किलो वजनी गटात मयुर मेणसेने दावणगेरे येथे कास्यपदक तर उडुपी येथे चौथा क्रमांक पटकाविला तर ग्रामीण स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. या दोघांना प्रशिक्षक उमेश सांबरेकर, संजय मेणसे, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, राष्ट्रीय पंच एम. गंगाधर यांचे बहुमोल मार्गदर्शन तर हेमंत हवळ, बसवराज अरळीमट्टी, सुनील राऊत यांचे प्रोत्साहन लाभत आहे.