मनिका बात्राचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ जेद्दाह
विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या ग्रँड स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिका बात्राचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या हिना हयाताने बात्राचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या आंतरराष्ट्रीय इलाइट स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी मनिका बात्रा ही एकमेव भारतीय महिला टेबल टेनिसपटू आहे. जपानच्या हिना हयाताने मनिका बात्राचा 7-11, 11-6, 11-4, 13-11, 11-7 असा पराभव केला. बात्राने या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात सौदी अरेबीयाच्या द्वितीय मानांकित मिटेलहॅमचा पराभव केला होता.
Home महत्वाची बातमी मनिका बात्राचे आव्हान समाप्त
मनिका बात्राचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ जेद्दाह विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या ग्रँड स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिका बात्राचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या हिना हयाताने बात्राचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या आंतरराष्ट्रीय इलाइट स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी मनिका बात्रा ही एकमेव भारतीय महिला […]