गुकेशचे पुनरागमन, प्रज्ञानंदसह कीमरवर मात

मॅग्नस कार्लसन/ वृत्तसंस्था/ वॉर्सा जागतिक स्पर्धेतील आव्हानवीर डी. गुकेशने शुक्रवारी येथे सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत खराब सुरुवातीनंतर उसळी घेत भारताचा आर. प्रज्ञानंद आणि जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर यांना पराभूत केले तसेच जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले. तथापि, प्रज्ञानंदने पाचव्या फेरीत हॉलंडच्या अनीश गिरीचा पराभव केला आणि त्यानंतर सहाव्या फेरीत कीमरवर विजय मिळवला. […]

गुकेशचे पुनरागमन, प्रज्ञानंदसह कीमरवर मात

मॅग्नस कार्लसन/ वृत्तसंस्था/ वॉर्सा
जागतिक स्पर्धेतील आव्हानवीर डी. गुकेशने शुक्रवारी येथे सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत खराब सुरुवातीनंतर उसळी घेत भारताचा आर. प्रज्ञानंद आणि जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर यांना पराभूत केले तसेच जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले. तथापि, प्रज्ञानंदने पाचव्या फेरीत हॉलंडच्या अनीश गिरीचा पराभव केला आणि त्यानंतर सहाव्या फेरीत कीमरवर विजय मिळवला.
नॉर्वेचा कार्लसन चीनच्या वेई यीसोबत प्रत्येकी आठ गुणांनिशी आघाडीवर आहे, तर प्रज्ञानंद आणि शेवचेन्को प्रत्येकी सात गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह, गुकेश आणि अर्जुन एरिगाइसी हे सहा गुणांसह संयुक्तरीत्या पाचव्या स्थानावर आहेत. ते स्थानिक स्टार डुडा जॅन-क्रिझस्टोफपेक्षा पूर्ण गुणाने पुढे आहेत. चार गुणांसह कीमर स्पर्धेत नवव्या स्थानावर असून तो गिरीपेक्षा एका गुणाने पुढे आहे.
रोमानियाच्या किरिल शेवचेन्कोची घोडदौड संपुष्टात आणताना एरिगाइसीने या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. पहिल्या दोन फेऱ्यांमधील पराभवानंतर बरोबरी साधलेल्या गुकेशने चौथ्या फेरीत 41 चालींमध्ये प्रज्ञानंदवर विजय मिळवला. दोघांवरही दडपण प्रचंड होते आणि विजयी स्थितीच्या जवळ पोहोचूनही प्रज्ञानंदला मुसंडी मारता आली नाही. त्यामुळे गुकेशला जोरदार पुनरागमन करता आले.
पण पुढच्या फेरीत प्रज्ञानंदने काही कठीण चालींसह गिरीला केवळ 21 चालींमध्ये पराभूत केले. दुसरीकडे गुकेशने पांढरी प्यादी घेऊन खेळताना कीमरचे आव्हान संपुष्टात आणण्याच्या बहुतेक संधी साधल्या. डुडाविऊद्धच्या दिवसाच्या सलामीच्या लढतीत अर्जुनला जरी फटका बसला, तरी नंतर शेवचेन्कोला पराभूत करताना त्याने चांगला खेळ केला. दिवसाच्या शेवटच्या लढतीत अर्जुनने अब्दुसत्तोरोव्हला बरोबरीत रोखले. कार्लसनने दुसऱ्या दिवसाच्या खेळात एक विजय आणि दोन बरोबरींची नोंद केली.