दिल्लीतील गुन्हेगाराचे उत्तर प्रदेशात एन्काउंटर

दिल्लीतील गुन्हेगाराचे उत्तर प्रदेशात एन्काउंटर

टाटा स्टीलच्या बिझनेस हेडच्या हत्येप्रकरणी वाँटेड
वृत्तसंस्था/ गाझियाबाद
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे शुक्रवारी सकाळी पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून गोळी लागून एक पोलीस उपनिरीक्षकही जखमी झाला. अक्की उर्फ दक्ष असे चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराचे नाव असून तो दिल्लीतील सलीमपूरचा रहिवासी आहे. चकमकीदरम्यान अक्कीचा एक साथीदार घटनास्थळावरून पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.
टाटा स्टीलचे नॅशनल बिझनेस हेड विनय त्यागी यांच्या 3 मे रोजी झालेल्या हत्येप्रकरणी अक्की पोलीस यंत्रणेसाठी ‘वाँटेड’ होता. अखेर अक्की या गुन्हेगाराला गाझियाबाद पोलिसांनी चकमकीत ठार केले. चकमकीमध्ये अक्की उर्फ दक्ष याच्या छातीत गोळी लागली होती. त्यानंतर ऊग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.