किया सोनेट एसयूव्ही नव्या प्रकारांमध्ये लाँच

किया सोनेट एसयूव्ही नव्या प्रकारांमध्ये लाँच

नवी दिल्ली :
किया इंडियाने त्यांच्या लोकप्रिय सब-4 मीटर एसयूव्ही सोनेटचे चार नवीन प्रकार नुकतेच सादर केले आहेत. यात एचटीइ आणि एचटीके प्रकारांचा समावेश आहे. यासोबतच यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीने या वर्षी 12 जानेवारी रोजी सोनेटचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे.
सुधारीत सोनेटच्या डिझाईनमध्ये काही सौंदर्यवर्धक बदल करण्यात आले आहेत. सदर मॉडेलमध्ये एलईडी डीआरएल, कनेक्ट केलेले एलईडी टेल लॅम्प आणि नवीन अलॉय व्हीलसह डिझाईन केले आहे. नव्या सोनेटमध्ये आता 360 डिग्री कॅमेरा, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स टेक्निक सारख्या 25 पेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश राहणार असल्याची माहिती आहे.
किंमतीचा तपशील पाहिल्यास यामध्ये सोनेटच्या नवीन मॉडेलची किमत ही 8.19 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. भारतात तिची मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉन, ह्युंडाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही-300 आदी कंपन्यांशी स्पर्धा राहणार असल्याचे संकेत आहेत.