2 जून रोजी केजरीवालांना तुरुंगात जावे लागणार
सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट : ईडीने केला होता एका वक्तव्याचा उल्लेख
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अरविंद केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. याप्रकरणी सुनावणी करत न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना 2 जून रोजी तुरुंगात जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही कुणासाठीच अपवाद निर्माण केलेला नाही. जे योग्य वाटले तेच आदेशात नमूद केले आहे. आमच्या निर्णयाच्या टीकात्मक विश्लेषणाचे स्वागत करतो असे खंडपीठाने म्हटले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. ईडीने केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. केजरीवालांनी अटकेच्या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले होते. ही कारवाई अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर सर्वोच्च न्यायालयोन केजरीवालांना निवडणूक प्रचारासाठी एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. केजरीवालांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे.
केजरीवालांच्या वक्तव्याचा उल्लेख
केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची याचिका सुनावणीयोग्य नाही. आम आदमी पक्षाला लोकांनी मतदान केले तर मला 2 जून रोजी तुरुंगात जावे लागणार नसल्याचे केजरीवाल यांनी जाहीर सभेत म्हटल्याचा उल्लेख मेहता यांनी सुनावणीदरम्यान केला. ही केवळ त्यांची कल्पना असून याप्रकरणी आम्ही काहीच करू शकत नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. आमचा आदेश स्पष्ट असून त्यांना आत्मसमर्पण करावेच लागेल असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट पेले.
केजरीवालांकडून धूवांधार प्रचार
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन मिळाल्यावर केजरीवाल हे जोरदार प्रचार करत आहेत. सर्वप्रथम त्यांनी दिल्लीत रोड शो केला आहे. यानंतर त्यांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षासाठी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. तर केजरीवालांनी गुरुवारी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. केजरीवाल यांचा पक्ष दिल्लीतील 4 तर पंजाबमधील सर्व 13 जागा लढवत आहे.
Home महत्वाची बातमी 2 जून रोजी केजरीवालांना तुरुंगात जावे लागणार
2 जून रोजी केजरीवालांना तुरुंगात जावे लागणार
सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट : ईडीने केला होता एका वक्तव्याचा उल्लेख वृत्तसंस्था /नवी दिल्ली दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अरविंद केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. याप्रकरणी सुनावणी करत न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना 2 जून रोजी तुरुंगात जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही कुणासाठीच अपवाद निर्माण केलेला […]