किल्ला तलावाच्या विकासाचे पाटबंधारे मंत्र्यांकडून आश्वासन

किल्ला तलावाच्या विकासाचे पाटबंधारे मंत्र्यांकडून आश्वासन

भेटीदरम्यान केली परिसराची पाहणी :  वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीसाठी प्राधान्य दिले जाणार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव किल्ला तलाव पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. वॉटर अॅक्टिव्हिटीनंतर या तलावामध्ये अन्य बदलही केले जाणार आहेत. या तलावाचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन लघुपाटबंधारे मंत्री एन. एस. बोसेराजू यांनी दिले. शनिवारी सकाळी किल्ला तलावाला भेट देऊन त्यांनी तेथील सुविधा जाणून घेतल्या.
बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी मंत्री बोसेराजू यांना किल्ला तलाव पाहण्याचे आमंत्रण दिले होते. बेळगाव शहरासाठी किल्ला तलाव उत्तम पर्यटनाचे ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळी व सायंकाळी नागरिक गर्दी करतात. त्यामुळे तलावातील पाण्याची स्वच्छता व इतर व्यवस्थेकडे लक्ष पुरविले जाणार आहे. तसेच वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीसाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे मंत्री बोसेराजू यांनी सांगितले.
आमदार राजू सेठ यांनी किल्ला तलाव परिसराची मंत्र्यांना माहिती दिली. या ठिकाणी इतर तलावांच्या धर्तीवर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

Go to Source