मे महिन्यात सोने खरेदी, भारत तिसरा मोठा देश

मे महिन्यात सोने खरेदी, भारत तिसरा मोठा देश

गोल्ड कौन्सीलच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने मे महिन्यात 722 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले आहे. या पद्धतीने सोने खरेदी करून भारत हा जगातील तिसरा मोठा देश बनला आहे. जगातील क्रमवारी पाहिल्यास सोने खरेदी करण्यामध्ये स्वित्झर्लंड हा पहिल्या क्रमांकावर आहे.
गोल्ड कौन्सिल यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. भारताने मे महिन्यामध्ये 722 कोटी रुपयांचे सोने खरेदी केले आहे. स्वित्झर्लंड आणि चीन या दोन देशांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करणारा भारत हा तिसऱ्या नंबरचा देश ठरला आहे.
5 वर्षात इतकी भर
गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये भारताने आपल्या सुवर्णसाठ्यामध्ये जवळपास 204 टन सोन्याची भर घातली आहे. 2019 मध्ये देशाचा सुवर्ण साठा 618.2 टन इतका होता. जो 31 मार्च 2024 रोजीअखेर 30 टक्के वाढीसह 822.1 टन इतका झाला आहे. दरम्यान सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास 70 टक्केची वाढ नोंदवली गेली आहे. किमतीत झालेल्या वाढीमुळे मागच्या महिन्यात जागतिक सुवर्ण बाजारात 18 लाख कोटींचे सरासरी सोने खरेदीचे व्यवहार झाले आहेत.