सोन्याचे दर कोसळले, आजचे दर जाणून घ्या
सोन्याचाचे दर कमी झाले असून मॅलिटी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे 10 ग्राम 24 कॅरेटच्या दरात430 रुपयांची घट झाली असून सोनं 72202 रुपये झाले आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. चांदीचे दर देखील कमी झाले असून चांदीचे एक किलोचे दर 84549 रुपये झाले आहे.
आज सकाळी एमसीएक्स वर 24 कॅरेट 10 ग्राम सोनं 72280 रुपयांवर होते. आज 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचे दर 73250 रुपये तर 10 ग्राम कॅरेट सोन्याचे दर 67150 रुपये आहे.
पुण्यात सोन्याचा आजचा भाव 67000 रुपये आहे तर मुंबई आणि नागपूर येथे सोन्याचे दर 67000 रुपये आहे.
सोन्याच्या दरातील होणाऱ्या चढ उतारावर अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे सोन्याच्या दरात होणाऱ्या घट मुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Edited by – Priya Dixit