युनियन जिमखान्याकडे गोव्याचा ‘एक्सपोजर’

युनियन जिमखान्याकडे गोव्याचा ‘एक्सपोजर’

बेळगावच्या मोहम्मद अब्बास, निखिल राठोड यांची भेदक गोलंदाजी
बेळगाव : गोवा येथे मडगाव क्रिकेट अकॅडमी आयोजित मडगाव  13 वर्षाखालील मुलांच्या अखिल भारतीय एक्सपोजर चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत बेळगावच्या युनियन जिमखाना संघाने बेंगलोरच्या जस्ट क्रिकेट अकॅडमी संघाचा थरारक लढतीत 5 गड्यांनी पराभव करुन अजिंक्यपद पटकावले. जिमखानाच्या अब्बास किल्लेदारला सामनावीर देण्यात आला. गोवा फातोर्डा मैदानावर प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 20 षटकात सर्वबाद 116 धावा केल्या. त्यात मोहम्मद अब्बासने 3 चौकारांसह 30, साईराज पोरवालने 3 चौकारांसह 19, फरहान शेखने 16 तर सलमान धारवाडकरने महत्त्वपूर्ण नाबाद 13 धावांचे योगदान दिले. जस्ट क्रिकेट अकादमा बेंगळुर तर्फे शौर्यसागर 3, सोहम जोशीने 2 तर ध्रुवकृष्णन व डॅनियल नरोना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाच्या शानदार गोलंदाजी व क्षेत्ररक्षणामुळे जस्ट क्रिकेट अकादमी संघाचा डाव 19.4 षटकात 111 धावात आटोपला. युनियन जिमखाना तर्फे मोहम्मद अब्बासने 11 धावांत 4 तर निखिल राठोडने सुरेख गोलंदाजी करताना 16 धावांत 3 गडी बाद करत आपल्या संघाच्या विजयास हातभार लावला. प्रमुख पाहुणे भाई नाईक, अमेय कोसंबे, दिघेष आंग्ले व हेमंत आंग्ले यांच्या हस्ते विजेत्या व विजेता संघांना तसेच सामनावीर मोहम्मद अब्बास यांना चषक देऊन गौरविण्यात आले.