चिकोडीत गॅरेजला आग; हजारोचे नुकसान

चिकोडीत गॅरेजला आग; हजारोचे नुकसान

कारसह स्पेअर पार्ट, स्क्रॅप आगीत भस्मसात
चिकोडी : शहरातील डंबळ प्लॉट येथील माळभागात असलेल्या एका ट्रक व कार गॅरेजला अचानक आग लागून एक कार भस्मसात व हजारो रुपयाचे स्क्रॅप मटेरियल, स्पेअर पार्ट  जळाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. चिकोडी येथील डंबळ प्लॉट परिसरात जावेद जहांगीर गवंडी यांचे गॅरेज असून या गॅरेजला अचानक आग लागली. आग लागताच 5:15 च्या सुमारास चिकोडी येथील अग्निशमन दलाला कॉल करून कळविण्यात आले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान हजर झाले तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत एका कारसह वाहनांचे स्पेअर पार्ट, स्क्रॅप मटेरियल जळाले. परिसरातील तीन एकरात ही आग पसरली होती.