माजी मुख्यमंत्री कुमारस्वामीही जाणार तुरुंगात

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामीही जाणार तुरुंगात

काँग्रेसच्या आमदाराचे स्फोटक विधान : कुमारस्वामींविरुद्धही महिलांकडून लैंगिक छळाच्या तक्रारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीही तुऊंगात जाणार असल्याचे स्फोटक विधान मद्दूरचे काँग्रेस आमदार कदलूर उदयगौडा यांनी केले आहे. मंड्यामध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, रेवण्णांप्रमाणेच कुमारस्वामींवरही तुऊंगात जाण्याची वेळ आली आहे. कुमारस्वामी यांच्याविरुद्धही महिला लैंगिक छळाच्या तक्रारी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत.
आमदार कदलूर उदयगौडा पुढे म्हणाले, प्रज्ज्वल रेवण्णा पेनड्राईव्ह प्रकरण बाहेर आल्यानंतर महिला माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्याचे धाडस करतील. कुमारस्वामी यांनीही लैंगिक अत्याचार केल्याची चर्चा आहे. अभिनेत्री राधिका यांना कुमारस्वामी आपल्या पत्नीप्रमाणे पाहत आहेत का?, त्यांच्या निकटवर्तीयांनी कुमारस्वामींच्या विरोधात अनेकदा आपल्याशी बोलले आहे, असेही त्यांनी सांगितले.
कुमारस्वामी यांनी आयुष्यभर इतरांना ब्लॅकमेल करून आणि त्यांची निंदा करून हे यश मिळवल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. प्रज्ज्वल रेवण्णाप्रकरणी निजदने राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करीत असल्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचा व्हिडिओ सरकारने बनवला होता का, असा प्रश्न करीत प्रज्ज्वल रेवण्णा यांनीच व्हिडिओ बनवला आहे. हा कौटुंबिक मुद्दा आहे, कुमारस्वामींनी जनतेची माफी मागावी. मात्र, कार्यकर्त्यांना घेऊन ते सरकारविरोधात आंदोलन करत आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.