सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

आज महाराष्ट्रात मतदान झाले. मतदान केल्यावर सुप्रियाताई सुळे या अजित पवारांच्या बारामतीच्या घरी गेल्या आणि त्यांनी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांचा आशीर्वाद घेत त्यांची भेट घेतली.बारामतीतून चौथ्यांदा लढवणाऱ्या  सुप्रिया सुळे यांची लढत यंदा चुलत भाऊ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी आहे. मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्या आणि आपल्या काकूंची भेट घेतली . 

सुप्रिया सुळे या मतदानांनंतर अजित पवारांच्या घरी त्यांच्या आईशी भेटल्यावर पत्रकारांना म्हणाल्या , हे माझ्या काकूंचे घर आहे. मी इथे त्यांना भेटायला आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आहे. 

 

या वर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, हा भावनिक मुद्दा आहे. सुप्रिया भावनिक राजकारण करत असून अजित पवारांच्या पाठीशी त्यांची आई आहे. 

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , सुप्रिया सुळे यांची अजित पवारांच्या घरी त्यांच्या आईंना जाऊन भेटणे ही भावनिक रणनीती असून काहीही नाही. शेवटी ते राजकीय प्रतिस्पर्धी आहे शत्रू नाही. सुप्रिया ताई या अजित पवारांची बहीण आहे. आता ही भावनिक रणनीती कशी काम करते पाहू या.  

Edited By- Priya Dixit 

 

Go to Source