प्रत्येकाचा एकच प्रश्न: कोण जिंकतंय?

प्रत्येकाचा एकच प्रश्न: कोण जिंकतंय?

लोकसभा निवणुकीच्या मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले असून सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी एकच प्रश्न आहे. तो असा की ही निवडणूक जिंकणार कोण ? विविध वृत्त वाहिन्या, अक्षरश: हजारोंच्या संख्येने असणारे यूट्यूबर्स आणि त्यांच्या वाहिन्या, वृत्तपत्रे आणि सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे सध्या या एकच चर्चेत गुंतलेली दिसतात. प्रत्येकाची अनुमाने निरनिराळी. या अनुमानांची कारणेही भिन्न.  या साऱ्या गजबजाटातून एक बाब स्पष्ट होत आहे. ती म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांना नि:पक्षपाती, परखड किंवा सचोटीच्या नियमांना धरुन अनुमाने व्यक्त करणारी प्रसारमाध्यमे अगदी अल्प प्रमाणात आहेत. जवळपास नाहीतच, म्हटले तरी चालेल. बहुतेक माध्यमे त्यांच्या विचारसरणीला किंवा त्यांचा राजकीय कल जसा आहे, त्यानुसार मतदान आणि इतर घटनांचे आकलन करुन घेऊन त्या आधारावर अनुमाने व्यक्त करीत आहेत. या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात सर्वसामान्य माणसाला काही बोध होण्यापेक्षा त्याचा गोंधळ उडण्याचीच शक्यता अधिक आहे. तरीही, या मतमतांतरांवर दृष्टीक्षेप टाकणे आवश्यक आहे…