कोथळी श्री क्षेत्रासाठी शुद्ध पेयजल युनिटची देणगी

कोथळी श्री क्षेत्रासाठी शुद्ध पेयजल युनिटची देणगी

बेळगाव : जैन धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या चिकोडी तालुक्यातील कोथळी शांतीगिरी श्री क्षेत्राला जितो सदस्यांनी स्वच्छ पेयजल युनिटची देणगी दिली. शुक्रवार 7 जून रोजी कोथळी शांतीगिरी येथे आचार्यरत्न देशभूषण महाराज यांची 37 वी पुण्यतिथी, आचार्य वरदत्तसागर महाराजांची 18 वी पुण्यतिथी आणि आचार्य विद्यानंदजी महाराज यांची 100 वी जयंती आणि महामस्तकाभिषेक कार्यक्रमात हा कार्यक्रम झाला. जितोचे सदस्य अभिजीत अंकले, गोपाल जिनगौडा, विक्रम अमिचंद जैन, हर्षवर्धन अनिल इंचल, प्रमोद एम. पाटील, शील मिर्जी, कुंतीनाथ कलमनी, राहुल हजारे यांच्या सहकार्याने शुद्ध पेयजल युनिट देण्यात आले. यावेळी शांतीगिरी ट्रस्टचे अध्यक्ष पी. आर. पाटील, सचिव बसगौडा पाटील व अन्य सदस्य उपस्थित होते.