मुंबई : दाऊदला अखेर 40 वर्षांनंतर अटक
गेल्या 40 वर्षांपासून फरार असलेला आरोपी पापा उर्फ दाऊद बंडू खान (70) याला आग्रा येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. अटक टाळण्यासाठी आरोपी आपली ओळख बदलत होता. डी.बी.मार्ग पोलिसांनी विशेष कारवाई करून त्याला अटक केली. बलात्कार प्रकरणातील आरोपी पापा उर्फ दाऊद बंडू खान याला 1984 मध्ये अटक करण्यात आली होती.याप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला दाऊद गैरहजर राहू लागला. अखेर सत्र न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. दाऊद गेल्या 40 वर्षांपासून फरार होता आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 यांनी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा मुंबईतील फॉकलंड रोड येथे शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. पोलीस पथकाने परिसरात चौकशी केली असता दाऊदने फॉकलंड रोड येथील घर विकून कुटुंबासह उत्तर भारतात रवाना झाल्याची माहिती मिळाली. मात्र आरोपी नेमके कुठे गेले हे पथकाला समजू शकले नाही.पोलीस हवालदार राणे यांनी दाऊदच्या संपर्कांची चौकशी सुरू केली. बातमीवरून त्यांना दाऊदचा ठावठिकाणा कळला. मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. आरोपी आग्रा परिसरात असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कोयंडे व एक पथक आग्रा येथे रवाना झाले. आग्रा परिसरातील आरोपींच्या घरावर पाळत ठेवण्यात आली होती. तांत्रिक पद्धती वापरून माहितीची पडताळणी केल्यानंतर दाऊद राहत असलेल्या परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. दाऊदला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे.हेही वाचासावधान! उबेरने प्रवास करताय? ‘अशी’ होऊ शकते फसवणूक
वीज बिलावरून भाडेकरूकडून घरमालकाची हत्या
Home महत्वाची बातमी मुंबई : दाऊदला अखेर 40 वर्षांनंतर अटक
मुंबई : दाऊदला अखेर 40 वर्षांनंतर अटक
गेल्या 40 वर्षांपासून फरार असलेला आरोपी पापा उर्फ दाऊद बंडू खान (70) याला आग्रा येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. अटक टाळण्यासाठी आरोपी आपली ओळख बदलत होता. डी.बी.मार्ग पोलिसांनी विशेष कारवाई करून त्याला अटक केली. बलात्कार प्रकरणातील आरोपी पापा उर्फ दाऊद बंडू खान याला 1984 मध्ये अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला दाऊद गैरहजर राहू लागला. अखेर सत्र न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. दाऊद गेल्या 40 वर्षांपासून फरार होता आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.
निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 यांनी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा मुंबईतील फॉकलंड रोड येथे शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. पोलीस पथकाने परिसरात चौकशी केली असता दाऊदने फॉकलंड रोड येथील घर विकून कुटुंबासह उत्तर भारतात रवाना झाल्याची माहिती मिळाली. मात्र आरोपी नेमके कुठे गेले हे पथकाला समजू शकले नाही.
पोलीस हवालदार राणे यांनी दाऊदच्या संपर्कांची चौकशी सुरू केली. बातमीवरून त्यांना दाऊदचा ठावठिकाणा कळला. मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. आरोपी आग्रा परिसरात असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कोयंडे व एक पथक आग्रा येथे रवाना झाले. आग्रा परिसरातील आरोपींच्या घरावर पाळत ठेवण्यात आली होती. तांत्रिक पद्धती वापरून माहितीची पडताळणी केल्यानंतर दाऊद राहत असलेल्या परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. दाऊदला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे.हेही वाचा
सावधान! उबेरने प्रवास करताय? ‘अशी’ होऊ शकते फसवणूकवीज बिलावरून भाडेकरूकडून घरमालकाची हत्या