अनुत्तीर्ण झाल्याने संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहाच्या खोलीत मृतदेह आढळला

अनुत्तीर्ण झाल्याने संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहाच्या खोलीत मृतदेह आढळला

नागपुरातील व्हीएनआयटी कॉलेज मध्ये शिकणाऱ्या संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिव्यांशु गौतम असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो पूर्णिया बिहारचा रहिवासी होता. 

दिव्यांशु काही विषयात नापास झाल्याने तो तणावाखाली होता. त्या कारणास्तव त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांशुच्या खोलीतून दुर्गंध येत असल्याने त्याच्या मित्रांना संशय आला नंतर त्यांनी पोलिसांना आणि वसतिगृह प्रशासनाला ही माहिती दिली.पोलीस घटनास्थळी पोहोचले नंतर दरवाजा तोडून मृतदेह जमिनीवर पडलेला होता.

मृतदेह पाहता दिव्यांशु ने दोन ते तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले असून या घटनेची माहिती कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई केली जाईल. 

 

 Edited by – Priya Dixit

 

Go to Source