छत्रपती संभाजी नगर : एकाच कुटुंबातील 7 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरच्या छावणी बाजारातील एका कपड्याच्या दुकानाला आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्य झाला.
सदर घटना छावणी बाजार मधील महावीर जैन मंदिराच्या बाजूला कपड्याचे दुकान आहे पहाटे च्या सुमारास या दुकानात आग लागून धुराचे लोट पसरले होते. धूर इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचला आणि त्यात गुदमरून एकाच कुटुंबातील 7 जण मृत्युमुखी झाले. आग मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास लागली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
आग 3 मजली इमारतीत लागली. पहिल्या मजल्यावर 7 जण होते. तर दुसऱ्या मजल्यावर देखील 7 जण होते. तर तिसऱ्या मजल्यावर दोघे जण राहत होते. पहिल्या मजल्यावरील लोकांना आगीचे माहित झाल्यावर ते तिथून निघाले मात्र दुसऱ्या मजल्यावरील लोकांना आग लागल्याचे समजले नाही आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीचे कारण मोटर सायकल मध्ये चार्जिंग होत असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये 2 पुरुष, 3 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited by – Priya Dixit