बेळगावच्या स्केटर्सची चमकदार कामगिरी

बेळगावच्या स्केटर्सची चमकदार कामगिरी

बेळगाव : गोवा  व सांगली येथे झालेल्या  खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले. या स्पर्धामध्ये 400 पेक्षा जास्त स्केटर्स सहभागी झाले होते. बेळगावच्या स्केटर्सनी 6 सुवर्ण, 3 रौप्य पदके एकूण 9 पदके जिंकली. या स्पर्धेत जान्हवी तेंडुलकरने 4 सुवर्ण, आरशन माडीवालेने 1 सुवर्ण, 3 रौप्य तर सौरभ साळोखे 1 सुवर्ण पदक पटकाविले. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, विश्वनाथ येलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक, गुडशेफर्ड स्केटिंग रिंक, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत आहेत.