पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत भूमी

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत भूमी

अभिनेत्रीच्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा
भूमी पेडणेकरची गणना बॉलिवूडच्या प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये होते. अलिकडेच तिचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘भक्षक’चे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित या चित्रपटाची समीक्षकांनीही प्रशंसा केली होती. भक्षकच्या यशानंतर भूमी आता पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. भूमी आता दलदल या नावाच्या वेबसीरिजमधून स्वत:ची अभिनयक्षमता दाखवून देणार आहे. प्राइम व्हिडिओच्या या सीरिजमध्ये भूमी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.
या वेबसीरिजचे दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांनी केले आहे. स्वत।ला आव्हान देणे मला आवडते. माझ्यासाठी दलदल अत्यंत आव्हानात्मक राहिले आहे, मी अशाप्रकारच्या शैलीत यापूर्वी कधीच काम केले नव्हते. यात अत्यंत शारीरिक परिश्रम देखील सामील होते असे भूमीने सांगितले आहे.
या सीरिजमध्ये भूमीने पोलीस उपअधीक्षक रीता परेरा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ही पोलीस अधिकारी सीरियल किलिंगची चौकशी करत असते. याचदरम्यान तिच्या आयुष्यात अनेक बदल घडतात असे दाखविले जाणार आहे. ही सीरिज विश धमीजा यांच्या भिंडी बाजार कलाकृतीवर आधारित आहे. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.