Pune Crime News : महिलेवर बलात्कार करीत मारहाण

Pune Crime News : महिलेवर बलात्कार करीत मारहाण

बारामती : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेवर यापूर्वी बलात्कार करण्यात आला. ती बारामतीत आली असता तिच्या घरी चार ते पाच साथीदारांसह जात तिला धमकी देत शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी दत्ता सोनवणे (रा. संघवी हाईटस, बारामती) व त्याचे अन्य अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली. दि. 1 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ही घटना घडली. या महिलेची सोनवणे याची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. ती बारामतीला आली असताना दि. 8 रोजी रात्री नऊच्या सुमारास तो एका मोटारीतून साथीदारांसह तिच्या घराजवळ आला.
त्याने तिला फोन करत घराखाली बोलावत शिवीगाळ केली. ती वापरत असलेला अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. सोनवणे याने तिचा मोबाईल तपासत मारहाण केली. विकास बाबर यांनी तेथे येत सोनवणे याच्या तावडीतून महिलेची सुटका करत तिच्या पतीला बोलावले. त्यानंतर सोनवणे हा तेथून मित्रांसह निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा

Pune News : कुरकुंभ परिसर कायम प्रदूषणात!
गरोदरपणातील आरोग्य दक्षता
राष्ट्र निर्माणमध्ये भारतीय जवानांचे मोठे योगदान: पंतप्रधान मोदी

The post Pune Crime News : महिलेवर बलात्कार करीत मारहाण appeared first on पुढारी.

बारामती : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेवर यापूर्वी बलात्कार करण्यात आला. ती बारामतीत आली असता तिच्या घरी चार ते पाच साथीदारांसह जात तिला धमकी देत शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी दत्ता सोनवणे (रा. संघवी हाईटस, बारामती) व त्याचे अन्य अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने याबाबत …

The post Pune Crime News : महिलेवर बलात्कार करीत मारहाण appeared first on पुढारी.

Go to Source