नारायणगाव : शरद पवार गटाचा उद्या ओतूरला मेळावा

नारायणगाव : शरद पवार गटाचा उद्या ओतूरला मेळावा

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा जुन्नर तालुक्याचा मेळावा सोमवारी (दि.13) ओतूर (ता.जुन्नर) येथे होणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष तुषार थोरात व ज्येष्ठ नेते शरद लेंडे यांनी संयुक्तिकरीत्या दिली. या मेळाव्याला खा. डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्याच्या नियोजनासाठी शनिवारी आळेफाटा येथे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ओतूर येथील मेळाव्यात पक्षाच्या तालुक्यातील विविध सेलच्या पदाधिका-यांच्या निवडी करून निवडीचे पत्र देण्यात येणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना ही शरद पवार यांच्या विचाराने पुढे जात असताना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसामन्यांना केंद्रबिंदू मानून सर्व समाजघटकांना एकत्र ठेवून पुढे जाण्याचा विचार महत्त्वाचा मानून काम करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
राजकीय स्थिती काहीही असली, तरी शरद पवार यांचा विचार तालु्क्यातील जनतेने स्वीकारला आहे. तालुक्याची जनभावना शरद पवार यांच्यासोबत जाण्याची असल्याचे दिसून येते. ओतूर येथील मेळावा नक्कीच कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरणार असल्याचे शरद लेंडे यांनी सांगितले. या मेळाव्याला खा. डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके मार्गदर्शन करणार असल्याचे शरद लेंडे यांनी सांगितले.
आ. बेनके उपस्थित राहणार नाहीत
याबाबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आमदार बेनके शरद पवारांच्या गटांसोबत की पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत याबाबत निर्णय त्यांनी अद्याप घेतलेला नाही.ओतुरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला आपण जाणार का, असे विचारले असता ते म्हणाले, 14 आणि 15 तारखेला माझी खा. ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पूर्वीच बैठक ठरली असल्याने मी ओतूरच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकणार नाही. तथापि जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ ठेवण्याचा माझा कायमस्वरूपी प्रयत्न राहील.
हेही वाचा

Pune News : कुरकुंभ परिसर कायम प्रदूषणात!
गरोदरपणातील आरोग्य दक्षता
राष्ट्र निर्माणमध्ये भारतीय जवानांचे मोठे योगदान: पंतप्रधान मोदी

 
The post नारायणगाव : शरद पवार गटाचा उद्या ओतूरला मेळावा appeared first on पुढारी.

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा जुन्नर तालुक्याचा मेळावा सोमवारी (दि.13) ओतूर (ता.जुन्नर) येथे होणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष तुषार थोरात व ज्येष्ठ नेते शरद लेंडे यांनी संयुक्तिकरीत्या दिली. या मेळाव्याला खा. डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या नियोजनासाठी शनिवारी आळेफाटा येथे …

The post नारायणगाव : शरद पवार गटाचा उद्या ओतूरला मेळावा appeared first on पुढारी.

Go to Source