दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा

दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा

त्र्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा; त्र्यंबकराजाची दररोज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रदोष पूजा होत असते. भगवान शिवाच्या आराधनेत प्रदोष पुजेला विशेष महत्व आहे. कार्तिक आणि चैत्र शुध्द प्रतिपदा या तिथीला नवीन संवत्सराचा प्रारंभ होत असतो. दररोजच्या प्रदोष पूजेत फुलांनी तर सणावाराला पोषाख करून पिंडीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्र्यंबकराजाचा शृंगार करण्यात येतो. वर्षभरात केवळ दोन वेळेस पाडव्याला पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवण्यात येतो. सुवर्ण मुखवटा ठेवतांना परंपरेने होणारा सोहळा देखील विशेष आहे. मंदिरात उपस्थित भाविक त्याचा लाभ घेतात. (Trimbakeshwar Shiva Temple)
पंचमुखी सुवर्ण मुखवटा देवस्थान ट्रस्ट इमारतीमधून पालखीत ठेवून मंगलवाद्य शखंध्वनी करत मंदिरात (Trimbakeshwar Shiva Temple)  आणला जातो. पुजारी तुंगार मुखवटा घेऊन गर्भगृहात असलेले प्रदोष पूजक आराधी यांच्याकडे देतात. तेथे असलेला दररोजच्या पुजेतील चांदीचा मुखवटा पुजारी तुंगार बाहेर आणतात व सभामंडपातील हर्ष महल अथवा आरसे महाल येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवतात. यावेळी त्र्यंबक राजाला दाखविण्यात येणारा नैवेद्य देखील वेगळा असतो. यामध्ये दिवाळी फराळ आणि मिष्ठान्न यांचा महानैवेद्य असतो. प्रदोष पूजक आराधी कुटुंबीय तो तयार करतात. या संपुर्ण सोहळयात विश्वस्त उपस्थित असतात. मंगळवारी दिवाळी पाडव्याला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मंदिरात पालखी निघाली. सोबत विश्वस्त रूपाली भुतडा, कैलास घुले, स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम कडलग,मनोज थेटे यासह शागिर्द मंगेश दिघे,अनंत दिघे उपस्थित होते.गर्भगृहात प्रदोष पूजक रंगनाथ आराधी, डॉ.ओमकार आराधी, ऍड.शुभम आराधी यांनी पुजा केली. माजी नगरसेविका मंगला आराधी यांनी महानैवेद्य आणला. तो भगवान त्र्यंबकराजास अर्पण केला.
यावेळेस प्रदीप तुंगार, कैलास देशमुख, राज तुंगार उपस्थित होते. यावेळेस सभामंडपातील दर्शनबारीत उपस्थित भक्तांनी या सोहळयाचा आनंद घेतला. रात्री आठ वाजेच्या सुमारास पुन्हा पालखी निघाली सुवर्ण मुखवटा संस्थान कार्यालयाच्या इमारतीत वाजतगाजत परत नेण्यात आला. (Trimbakeshwar Shiva Temple)
हेही वाचा :

जळगाव : मध्य रेल्वेतील अनधिकृत फेरीवाल्यांकडून २ कोटी 72 लाखांचा दंड वसूल 
जळगाव : वावळदा येथे शेतातील रखवालदाराचा खून करुन ट्रॅक्टर चोरी

The post दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा appeared first on पुढारी.

त्र्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा; त्र्यंबकराजाची दररोज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रदोष पूजा होत असते. भगवान शिवाच्या आराधनेत प्रदोष पुजेला विशेष महत्व आहे. कार्तिक आणि चैत्र शुध्द प्रतिपदा या तिथीला नवीन संवत्सराचा प्रारंभ होत असतो. दररोजच्या प्रदोष पूजेत फुलांनी तर सणावाराला पोषाख करून पिंडीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्र्यंबकराजाचा शृंगार करण्यात येतो. वर्षभरात केवळ दोन वेळेस पाडव्याला पंचमुखी …

The post दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा appeared first on पुढारी.

Go to Source