भारताची फायनलमध्ये धडक! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

भारताची फायनलमध्ये धडक! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India in WC Final : भारतीय संघाने वनडे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताने टॉस जिंकून पहिला फलंदाजी केली. त्यानंतर विराट कोहली (117), श्रेयस अय्यर (105), शुबमन गिल (नाबाद 80), रोहित शर्मा (47), केएल राहुल (नाबाद 39) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 397 धावांचा डोंगर रचला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघ 48.5 षटकांत सर्व विकेट्स गमावून 327 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यांच्या डॅरेल मिचेलने (134), केन विल्यमसन (69), ग्लेन फिलिप्स (41) यांनी सामना जिंकण्यासाठी झुंज दिली. टीम इंडियाच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 बळी मिळवले. तर जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवला 1-1 विकेट मिळाली. (Team India in WC Final)
The post भारताची फायनलमध्ये धडक! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India in WC Final : भारतीय संघाने वनडे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने टॉस जिंकून पहिला फलंदाजी केली. त्यानंतर विराट कोहली (117), श्रेयस अय्यर (105), शुबमन गिल (नाबाद 80), …

The post भारताची फायनलमध्ये धडक! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव appeared first on पुढारी.

Go to Source