महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी इचलकरंजीतील ६ पैलवानांची निवड

महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी इचलकरंजीतील ६ पैलवानांची निवड

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : धाराशिव येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी व्यंकोबा मैदान इचलकरंजी येथील सहा पैलवानांची महाराष्ट्र केसरी विविध वजन गटात निवड झाली आहे. दिनांक 16 ते 20 या दरम्यान ही स्पर्धा धाराशिव येथे होणार आहे.
पैलवान श्रीमंत भोसले(महाराष्ट्र केसरी गट), पैलवान प्रशांत जगताप (महाराष्ट्र केसरी वजन गट), पैलवान शहाजी फल्ले ( 97 किलो वजन गट), पैलवान प्रणव बोत्रे (92 किलो वजन गट), पैलवान लक्ष्मण जाधव (76किलो वजन गट) या पैलवानांची निवड झाली आहे. वरील पैलवानांस माजी खासदार कल्लाप्पांना आवाडे, माजी आमदार सुरेशराव हळवणकर, महावीर आण्णा गाट यांचे प्रोत्साहन व पैलवान अमृतमामा भोसले, कुस्ती कोच सतीश सूर्यवंशी, कुस्ती कोच सुरज मगदूम याचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा :

Virat kohli New Record : विराट कोहली उपांत्य फेरीत रचणार ‘हे’ 2 मोठे विक्रम! सचिनचा विक्रम निशाण्यावर
6 Wickets in 6 Balls : एका षटकात 6 विकेट! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या थरारक कामगिरीने खळबळ
महाराष्ट्रात साकारणार कामाख्या देवीचे मंदिर : मुख्यमंत्री सरमा | Kamakhya Temple in Maharashtra

The post महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी इचलकरंजीतील ६ पैलवानांची निवड appeared first on पुढारी.

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : धाराशिव येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी व्यंकोबा मैदान इचलकरंजी येथील सहा पैलवानांची महाराष्ट्र केसरी विविध वजन गटात निवड झाली आहे. दिनांक 16 ते 20 या दरम्यान ही स्पर्धा धाराशिव येथे होणार आहे. पैलवान श्रीमंत भोसले(महाराष्ट्र केसरी गट), पैलवान प्रशांत जगताप (महाराष्ट्र केसरी वजन गट), पैलवान शहाजी फल्ले ( 97 …

The post महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी इचलकरंजीतील ६ पैलवानांची निवड appeared first on पुढारी.

Go to Source