रचिनच्या नावाविषयी वडील रवी कृष्णमूर्ती यांचा खुलासा; म्हणाले,…

रचिनच्या नावाविषयी वडील रवी कृष्णमूर्ती यांचा खुलासा; म्हणाले,…

पुढारी ऑनलाईन डेस्क : या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला नेण्यात न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रवींद्रने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडसाठी त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. भारतीय वंशाच्या रचिनचे चाहत्यांकडून खूप कौतुक केले जात आहे. त्याच्या नावाबद्दलही लोकांना उत्सुकता आहे. अलीकडेच रचिनचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावरून ठेवल्याची चर्चा होती. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांनी आता यासंदर्भात एक खुलासा केला आहे.
संबंधित बातम्या : 

ऐश्वर्या रायबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर रझाकचा माफीनामा
आज भारत न्यूझीलंडशी भिडणार; १२ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य
रोहित शर्माचा न्यूझीलंड संघाला इशारा, म्हणाला…

रवी कृष्णमूर्ती यांनी आपल्या मुलाच्या नावामागील खरी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने हे नाव सुचवले होते आणि त्याचा राहुल-सचिनशी काहीही संबंध नव्हता. “जेव्हा रचिनचा जन्म झाला, तेव्हा माझ्या पत्नीने हे नाव सुचवले आणि आम्ही त्यावर चर्चा करण्यात जास्त वेळ घालवला नाही,” असे कृष्णमूर्ती यांनी ‘द प्रिंट’ या वृत्तवाहिनीला सांगितले.
रचिनचे वडील पुढे म्हणाले की, “नाव छान वाटले. उच्चार करणे सोपे आणि लहान होते, म्हणून आम्ही हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनी लक्षात आले की हे नाव राहुल आणि सचिनच्या नावांचे मिश्रण आहे. रचिन हे नाव आम्हाला आमच्या मुलाने क्रिकेटर किंवा तसं काही व्हावं या उद्देशाने ठेवण्यात आलेलं नाही.”
रचिनचे कुटुंब मूळचे भारतीय असून, ते न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले आहेत. रचिनला भारतात भरपूर प्रेम आणि पाठिंबा मिळण्यामागचं हे एक कारण आहे. रचिनचे आई-वडील ९० च्या दशकात भारतातून न्यूझीलंडमध्ये शिफ्ट झाले होते. रचिन तिथेच वाढला. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या विश्वचषकात त्याने ९ लीग सामन्यांमध्ये ७०.६२ च्या सरासरीने ५६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.
हेही वाचा : 

वर्ल्डकप जिंकणा-या संघाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या..
विराट कोहली उपांत्य फेरीत रचणार ‘हे’ 2 मोठे विक्रम!
एका षटकात 6 विकेट! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या थरारक कामगिरीने खळबळ

 
The post रचिनच्या नावाविषयी वडील रवी कृष्णमूर्ती यांचा खुलासा; म्हणाले,… appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला नेण्यात न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रवींद्रने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडसाठी त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. भारतीय वंशाच्या रचिनचे चाहत्यांकडून खूप कौतुक केले जात आहे. त्याच्या नावाबद्दलही लोकांना उत्सुकता आहे. अलीकडेच रचिनचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावरून ठेवल्याची चर्चा …

The post रचिनच्या नावाविषयी वडील रवी कृष्णमूर्ती यांचा खुलासा; म्हणाले,… appeared first on पुढारी.

Go to Source