Pune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा

Pune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा

केडगाव : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ५० वर्ष पुर्ण झाल्याने केक कापून या इमारतीचा वाढदिवस साजरा केला गेला आहे. ब्रिटीशकालीन सुरू झालेल्या पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील केडगाव हे जुने स्थानक असून या ठिकाणाहून रेल्वेचा एकेरी मार्ग जात होती.१९७३ मध्ये जुन्या रेल्वे स्थानक स्थलांतरित करण्यात आले होते. तत्कालीन आमदार उषाताई जगदाळे यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते आज त्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश मार्गावर रंगी बेरंगी फुग्यांची कमान लावण्यात आली होती.
संबंधित बातम्या :

बारामतीचं मैदान शरद पवार मारतील : संजय राऊत
Manoj Jarange Patil : आजपासून मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा सुरू
नवी मुंबई : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू

परिसराची स्वच्छता रोजच्यांपेक्षा चांगली करण्यात आली होती . या सोहळ्यासाठी रेल्वेतून सेवा निवृत्त झालेले आणि ज्यांनी गेली ४० वर्ष याच स्थानकावर सेवा केली होती ते साहेबराव गेनबा शेलार यांच्या बरोबर ३४ वर्ष हडपसर ते दौंड या लोहमार्गावरती इंजीनियरिंग रेल्वे ट्रॅक म्हणून सेवा करून निवृत्त झालेले सय्यद इब्राहिम ,यांच्यासह बोरीपार्धी ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडणवर,केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी रेल्वे स्थानकावर ४५ वर्ष रेल्वेने प्रवास केला असे जे. पी. अग्रवाल, रफिक सय्यद , मनीष बारवकर,यांच्यासह रेल्वे स्टेशन व्यवस्थापक पी.एम. घोरमारे सहाय्यक स्टेशन प्रबंधक राजू कुमार प्रिन्स त्यागी गोपाल सिंग मुख्य वाणिज्य पर्यवेक्षक मुनेश्वर रजक बुकिंग सुपरवायझर राहुल शिंदे अभय कुमार वाणिज्य क्लार्क मधुकांत निराला पॉईंट्समन मधुकर गायकवाड विलास जगताप महेश जगताप अभिजीत महोरियल, संतोष राक्षे आदेश कुमार आर पी एफ चे सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र मलकेकर आदींसह केडगाव बोरी पार्धी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रिटिश कालीन राजवटीतील या रेल्वे स्थानकाचा निर्माण करण्यासाठी मागचा मूळ हेतू पंडिता रमाबाई यांचाच होता त्यांची जागतिक पातळीवरती असलेले विधवा, मतिमंद, अपंग या महिलांचा आश्रम या ठिकाणी आहे आणि या आश्रमाला भेट देण्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना रेल्वेची सोय व्हावी यासाठी स्थानकाचा निर्माण करण्यात आलेला आहे अशी माहिती यावेळी काही ज्येष्ठ प्रवाशांनी दिली आहे.
सुरुवातीच्या काळात वाफेवरील कोळशाचे इंजन आणि सिंगल लाईन असल्यामुळे चार गाड्या धावत असतात यामध्ये प्रामुख्याने सोलापूर पुणे पॅसेंजर असायची महाराष्ट्र एक्सप्रेस ती नागपूरपर्यंत जाणारी होती हैदराबाद एक्सप्रेस आणि दौंड पुणे शटल असा चार गाड्यांचा प्रवास होत होता सध्या या ठिकाणावरून जवळपास 13 जाणाऱ्या आणि 13 येणाऱ्या अशा 26 गाड्यांचा प्रवास होत आहे अशी माहिती स्टेशन व्यवस्थापक प्रकाश गोटमारे यांनी दिली आहे पूर्वीच्या रेल्वेच्या स्टेशन वरील सुविधा आणि आत्ता असणाऱ्या सुविधा यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक झालेला आहे पूर्वी कोळशाच्या इंजिन असताना घंटा वाजवून गाडी सुटली याचा इशारा दिला जात होता.आता स्पीकर वरून आलउन्स केला जात आहे.
पूर्वीच्या सिंग्नल ह्या पत्र्याच्या होत्या.त्यांना तारानच्या साह्याने खालीवर केल्या जायच्या आता बदल झाला आहे .त्या विजेवरील आल्या आहेत आणि कंट्रोल करणे अवघड नाही. स्थानात पूर्वी रात्री उशिरा असलेल्या गाडीने प्रवाशी आल्यास त्याची राहण्याची सोय करावी लागत होती अशी माहीत साहेबराव शेलार यांनी दिली आहे. या वेळी मागील ५० वर्षा पूर्वीची रेल्वे आणि त्यावेळी.असणाऱ्या सुविधा साधने याबाबत अनेक विषयांचा माहिती पट या निमित्ताने उलगडण्यात आला .त्याच तुलनेत हललीच्या रेल्वेची सेवा आणि प्रगती यावर सुधा चर्चा झाली . केक भरूउ नइमारतीच्या ५०व्यां वाढदिवसाचा सोहळा सर्वांनी साजरा केला .
The post Pune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा appeared first on पुढारी.

केडगाव : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ५० वर्ष पुर्ण झाल्याने केक कापून या इमारतीचा वाढदिवस साजरा केला गेला आहे. ब्रिटीशकालीन सुरू झालेल्या पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील केडगाव हे जुने स्थानक असून या ठिकाणाहून रेल्वेचा एकेरी मार्ग जात होती.१९७३ मध्ये जुन्या रेल्वे स्थानक स्थलांतरित करण्यात आले होते. तत्कालीन आमदार उषाताई …

The post Pune News : केडगाव रेल्वे स्थानकाचा ५० वा वाढदिवस साजरा appeared first on पुढारी.

Go to Source