दिवाळीत सेन्सेक्सची रॉकेट भरारी, ६०० अंकांनी वधारला

दिवाळीत सेन्सेक्सची रॉकेट भरारी, ६०० अंकांनी वधारला

पुढारी ऑनलाईन : जागतिक मजबूत संकेतांमुळे शेअर बाजाराने आज बुधवारी (दि. १५) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढून ६५,५३५ वर पोहोचला. तर निफ्टी १७५ अंकांनी वाढून १९,६३० वर व्यवहार करत आहे. सर्व क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे. बाजारातील तेजीला बँकिंग, आयटी आणि मेटल क्षेत्रामुळे सपोर्ट मिळाला आहे. (Stock Market Opening Bell)

सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, इन्फोसिस, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढले आहेत. तर पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली आहे.
निफ्टीवर हिंदाल्को इंडस्ट्रीज, कोल इंडिया, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील आणि अदानी एंटरप्रायझेस हे वधारले आहेत, तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये घसरण दिसून आली आहे. (Stock Market Opening Bell)
 
 
The post दिवाळीत सेन्सेक्सची रॉकेट भरारी, ६०० अंकांनी वधारला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : जागतिक मजबूत संकेतांमुळे शेअर बाजाराने आज बुधवारी (दि. १५) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढून ६५,५३५ वर पोहोचला. तर निफ्टी १७५ अंकांनी वाढून १९,६३० वर व्यवहार करत आहे. सर्व क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे. बाजारातील तेजीला बँकिंग, आयटी आणि मेटल क्षेत्रामुळे सपोर्ट मिळाला आहे. (Stock Market Opening Bell) सेन्सेक्सवर …

The post दिवाळीत सेन्सेक्सची रॉकेट भरारी, ६०० अंकांनी वधारला appeared first on पुढारी.

Go to Source