दिवाळीची सुटी दीर्घ करा : एडेलवाईजच्या सीईओंची मागणी

दिवाळीची सुटी दीर्घ करा : एडेलवाईजच्या सीईओंची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : एडेलवाईज म्युचअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक राधिका गुप्ता यांनी भारतात दिवाळीनंतर एक आठवड्यांची दीर्घ सुटी असली पाहिजे अशी कल्पना मांडली आहे. पाश्चात्य देशात ख्रिस्मसला तर चीनमध्ये चिनी नववर्षासाठी अशी दीर्घ सुटी देण्याची पद्धत आहे, तशाच प्रकारची सुटी भारतात दिवाळीला मिळाली पाहिजे असे गुप्त यांनी म्हटले आहे. (diwali holiday)
राधिका गुप्ता बरीच वर्षं परदेशात राहिलेल्या आहेत. अमेरिकेत ख्रिस्मसची सुटी १५ डिसेंबरपासून सुरू होते आणि ती नववर्षापर्यंत असते असे त्यांनी म्हटले आहे. भारतातील कॉर्पोरेट कंपन्यात दिवाळीची सुटी ही एक किंवा दोन दिवसाची असते. दिवाळी आणि शनिवार, रविवार जोडून आला तर अनेक लोक कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जातात, बऱ्याच वेळा कुटुंब आणि कामाचे ठिकाण यात बरेच अंतर असते, असे त्यांनी म्हटले आहे. diwali holiday
“अशा प्रकारे दीर्घ सुटी दिली तर सणाचा आनंद कुटुंबासमवेत घेता येईल आणि सुट्यांचे दिवस मोजत बसावे लागणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर गुप्ता यांच्या मताला पाठिंबा मिळत आहे. फिबकॉन या कंपनीचे CEO प्रभू यांनी गुप्ता यांचे समर्थन केले आहे. हाँगकाँगमध्ये ख्रिसमस आणि चिनी नववर्षासाठी अशी सुटी मिळते आणि अशा वेळी सॉफ्टवेअर आणि इतर तंत्रज्ञान विषयक कंपन्यात कोणतेही मोठे बदल केले जात नाहीत, असे प्रभू यांनी म्हटले आहे..
हेही वाचा

Marathi Actors Deepawali : मराठी अभिनेत्रींनी अशी साजरी केली दिवाळी, फोटोज व्हायरल
टीम इंडियाच्‍या खेळाडूंनी कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी ( Video)
Prime Minister Narendra Modi: दिवाळीनिमित्त PM मोदी हिमाचल प्रदेशमध्‍ये जवानांच्या भेटीला

The post दिवाळीची सुटी दीर्घ करा : एडेलवाईजच्या सीईओंची मागणी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : एडेलवाईज म्युचअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक राधिका गुप्ता यांनी भारतात दिवाळीनंतर एक आठवड्यांची दीर्घ सुटी असली पाहिजे अशी कल्पना मांडली आहे. पाश्चात्य देशात ख्रिस्मसला तर चीनमध्ये चिनी नववर्षासाठी अशी दीर्घ सुटी देण्याची पद्धत आहे, तशाच प्रकारची सुटी भारतात दिवाळीला मिळाली पाहिजे असे गुप्त यांनी म्हटले आहे. (diwali holiday) राधिका गुप्ता …

The post दिवाळीची सुटी दीर्घ करा : एडेलवाईजच्या सीईओंची मागणी appeared first on पुढारी.

Go to Source