‘महादेव ॲप’ प्रकरणात अभिनेता अन् ‘या’ उद्योगपतींवर गुन्हा दाखल

‘महादेव ॲप’ प्रकरणात अभिनेता अन् ‘या’ उद्योगपतींवर गुन्हा दाखल


पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील माटुंगा पोलिसांनी ‘महादेव ॲप’ प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांना महादेव या सट्टेबाज ॲप प्रमोटरसह अन्य ३२ जणांविरोधी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे गौरव बर्मन आणि मोहित बर्मन या दोन उद्योगपतींच्या नावांचादेखील सहभाग आहे, असे वृत्त एएनआयने ‘X’ सोशल मीडिया अकाऊंटवरून दिले आहे. (Mahadev Betting App)
एएनआयने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी ॲपच्या प्रवर्तकासह ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संबंधित संशयितांवर जुगार आणि फसवणूक प्रकरणातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आयपीसीच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (बी) या कलमांचा समावेश आहे. ‘महादेव ॲप’ प्रकरणात पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे डायरेक्टर गौरव बर्मन आणि चेयरमन मोहित बर्मन यांच्यादेखील नावांचा समावेश आहे. तसेच इतर अनेक दिग्गज नावांचा या यादीत समावेश असल्याचे देखील माध्यमांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (Mahadev Betting App)

Mahadev betting app | Mumbai police have registered a case against 32 people including the promoter of the app under various sections of fraud and gambling. Police have included names of actor Sahil Khan and Dabur company’s Gaurav Burman and Mohit Burman and others in the FIR…
— ANI (@ANI) November 14, 2023

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महादेव बुकिंग ॲपवर बंदी घातली आहे. हे ॲप ईडीच्या चौकशीत असून, या प्रकरणी ईडीने छत्तीसगडमधून दोन पोलिसांनाही अटक केली आहे. गेल्या आठवड्यात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार महादेव बेटिंग ॲपबाबत मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आली. या एफआयआरच्या प्रतीमध्ये आरोपी क्रमांक 16 आणि आरोपी क्रमांक 18 हे उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन आहेत. (Mahadev Betting App)
हेही वाचा:

Mahadev Betting App Malpractice : महादेव बेटिंग ॲप गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्रात तक्रार दाखल
Mahadev Betting App : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महादेव बेटींग ॲपसह २२ ऑनलाइन ॲपवर बंदीचे आदेश
Mahadev betting app case | मुख्यमंत्र्यांनी ‘सत्तेत बसून सट्टेबाजीचा खेळ खेळला’: स्मृती इराणी

The post ‘महादेव ॲप’ प्रकरणात अभिनेता अन् ‘या’ उद्योगपतींवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील माटुंगा पोलिसांनी ‘महादेव ॲप’ प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांना महादेव या सट्टेबाज ॲप प्रमोटरसह अन्य ३२ जणांविरोधी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे गौरव बर्मन आणि मोहित बर्मन या दोन उद्योगपतींच्या नावांचादेखील सहभाग आहे, असे वृत्त एएनआयने ‘X’ सोशल मीडिया अकाऊंटवरून दिले आहे. (Mahadev Betting …

The post ‘महादेव ॲप’ प्रकरणात अभिनेता अन् ‘या’ उद्योगपतींवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Go to Source