काय आहे डीपफेक तंत्रज्ञान? कसे केले जातात मॉर्फींग व्हिडिओ

नवी दिल्ली डीपफेक हा एक बनावट व्हिडिओ किंवा फोटोचा प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्याचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने बदलला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे बनावट व्हिडिओ बनवले जातात. (Deepfake Technology ) डीपफेक व्हिडिओ हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडियाचा प्रकार असून असे डीपफेक व्हिडिओ इतके अचूक असतात की ते सहज ओळखू शकत नाही. … The post काय आहे डीपफेक तंत्रज्ञान? कसे केले जातात मॉर्फींग व्हिडिओ appeared first on पुढारी.

काय आहे डीपफेक तंत्रज्ञान? कसे केले जातात मॉर्फींग व्हिडिओ

प्रशांत शिरसाळे

नवी दिल्ली
डीपफेक हा एक बनावट व्हिडिओ किंवा फोटोचा प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्याचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने बदलला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे बनावट व्हिडिओ बनवले जातात. (Deepfake Technology ) डीपफेक व्हिडिओ हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडियाचा प्रकार असून असे डीपफेक व्हिडिओ इतके अचूक असतात की ते सहज ओळखू शकत नाही. डीपफेक व्हिडिओ मनोरंजन, शिक्षण आणि चुकीच्या माहितीसह, खोट्या बातम्या पसरविण्यासाठी वापरले जाऊ शकतात. (Deepfake Technology)

रश्मिकानंतर कॅटरिना : Deep Fakeने टायगर ३मधील ‘टॉवेल’ सीनचे आक्षेपार्ह मॉर्फिंग 
रश्मिका ठरली Deep Fakeची बळी; मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; Big Bनी केली कारवाईची मागणी | Rashmika Deep Fake Video
शिवाली परब ‘मासोळी ठुमकेवाली’ म्युझिक व्हिडिओ पाहिला का?

काय आहे डीपफेक तंत्रज्ञान?
डीपफेक तंत्रज्ञान हे कृत्रिम बुद्धिमत्ताचा एक प्रकार असून त्याचा वापर लोक अशा गोष्टींसाठी करत आहेत जे ते प्रत्यक्षात कधीच करू शकले नसते. एखाद्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओंचे मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचे स्वरूप आणि आवाज यांचे वास्तववादी मॉडेल तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग बनवली जाते. यालाच डीप सिंथेसिस तंत्रज्ञान म्हणतात. डीपफेक हे सखोल संश्लेषण तंत्रज्ञानातील सर्वात कुप्रसिद्ध प्रयोगांपैकी एक आहे.
डीपफेक तंत्रज्ञानोचे ताजे उदाहरण म्हणजे सिने अभिनेत्री रश्मिका मंदानाचा बनावट व्हिडिओ मात्र या आधी देखिल २०१७ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा असाच एक बनावट व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता ज्यात ते डोनाल्ड ट्रम्प यांना शिवीगाळ करताना दिसले, प्रत्यक्षात ते असे काही बोललेच नव्हते. सुरुवातीला या बनावट व्हिडिओला खरे मानले गेले आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. २०१८ मध्ये अभिनेत्री स्कारलेट जोहानसनचा एसाच एक बनावट व्हिडिओ समोर आला ज्यात त्या क्रिप्टोकरन्सीतील घोटाळ्याचा प्रचार करताना दिसली जो पर्यंत त्या व्हिडिओची सत्यता तपासली गेली तोपर्यंत लोकांचे पैसे बुडाले.
या तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे सर्वात मोठा धोका महिलांना असून त्यांना लैंगिक वस्तूच्या रूपात डीपफेकच्या माध्यमातून सर्वात जास्त दाखवले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अश्लिल व्हिडिओ बनवले जातात. राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात डीपफेकला शस्त्र बनवू शकतात बनावट व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या मतात देखिल फेरफार करू शकतात. या शिवाय, चॅटबॉट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेव्दारे बनवलेली सामग्री मानवी आणि मशीन निर्मित सामग्रीमधील रेषा अस्पष्ट करते, त्यामुळे खरी आणि बनावट माहितीमध्ये फरक करणे कठीण होते.
सायबर तज्ज्ञ अमित दुबे यांनी डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या ॲप्लिकेशन आणि टूल्सवर नजर ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले. अशी सामग्री बनवणाऱ्याची माहिती देखील मध्यस्थ प्लॅटफर्मसने आपल्याकडे ठेवायला हवी. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता अधिक कडक कायद्याची गरज देखिल त्यांनी बोलून दाखवली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे जाणकार सुमित शुक्ला यांनी सोशल मीडियावर वैयक्तिक खासकरून खासगीतले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करू नये असे सांगितले. प्रत्येकजण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे शक्यतो आपले प्रोफाईल खासगी ठेवावे आणि थोड्या दिवसात पासवर्ड चेंज करत राहावा.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनेच डीपफेक व्हिडिओ ओळखू शकतो. एआय ऑर नॉट आणि हाईव्ह मॉडरेशन सारखे ॲप्लिकेशन डीपफेक ओळखण्यासाठी वापरले जाऊ शकतात. हे अॅप्लिकेशन्स डीपफेक व्हिडिओ सहजपणे शोधून काढतात. याशिवाय डीपवेअर स्कॅनर, वीव्हेरिफाई, सेंटिनेल, मायक्रोसॉफ्टचे व्हिडिओ ऑथेंटिकेटर या टूल्सच्या मदतीने कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शोधता येतो.
The post काय आहे डीपफेक तंत्रज्ञान? कसे केले जातात मॉर्फींग व्हिडिओ appeared first on पुढारी.

नवी दिल्ली डीपफेक हा एक बनावट व्हिडिओ किंवा फोटोचा प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्याचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने बदलला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे बनावट व्हिडिओ बनवले जातात. (Deepfake Technology ) डीपफेक व्हिडिओ हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडियाचा प्रकार असून असे डीपफेक व्हिडिओ इतके अचूक असतात की ते सहज ओळखू शकत नाही. …

The post काय आहे डीपफेक तंत्रज्ञान? कसे केले जातात मॉर्फींग व्हिडिओ appeared first on पुढारी.

Go to Source