करवा चौथसाठी १६ शृंगार, मंगल दिनी सजून-धजून व्हा तयार!

करवा चौथसाठी १६ शृंगार, मंगल दिनी सजून-धजून व्हा तयार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : करवा चौथच्याया मंगल दिनी स्त्रियांचे सजणे-धजणे आलेच. या शुभ दिनासाठी १६ शृंगाराची यादी देत आहोत. जे करवा चौथसाठी खूप पवित्र मानले गेले आहे. (16 Shringar List For Karwa Chouth) यामध्ये स्त्रियांच्या पोषाखापासून ते दागिन्यांपर्यंत शृंगारासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी आहे.
संबंधित बातम्या : 

Karwa Chauth ad : समलैंगिक जोडप्याचं ‘करवा चौथ’, ‘त्या’ जाहिरातीवरून वाद
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते मूर्खपणाचा कळस माझी आई पंजाबी; ती करवा चौथ करते
Wedding Contract Best Gift : लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट ठरलं ‘बेस्ट गिफ्ट’; ‘त्या’ कपलला महिन्याला मिळणार ‘पिझ्झा ट्रिट’(VIDEO)

१) लाल जोडा – करवा चौथदिनी सर्रास लाल जोडा अथवा लाल रंगाचे पोषाख वापरले जातात. सुहासिनींसाठी लाल जोडा या दिवशी खूप पवित्र मानले जाते.
२) मेहंदी- करवा चौथला पतीच्या नावाची मेहंदी लावली जाते. हातांचे सौंदर्य वाढवणारे हे एक माध्यम आहे. असे म्हटले जाते की. यामुळे दोघांमधील खूप प्रेम वाढतं.
३) सिंदूर – सिंदूर लावणे आजकालची फॅशन असली तरी सिंदूरला सुहासिनींमध्ये खूप महत्तव आहे. केसांच्या भांगेत सिंदूर भरले जाते. यामुळे पती दीर्घायुषी होतो, असे म्हटले जाते.

४) मंगळसूत्र- करवा चौथ दिवशी मंगळसूत्राला खूप महत्त्व आहे. सुहासिनी असल्याचे हे एक प्रतिक आहे. यादिवशी गळ्यात नौलखा हार किंवा सुवर्णमाळ घातली जाते.
५) टिकली – कपाळावर टिकली लावणे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. करवा चौथदिवशी नटण्यासाठी बाजारात अनेक डिझाईन्सच्या टिकल्या (बिंदी) उपलब्ध आहेत.
६) पैंजण- यास उत्तरेकडे पाजेप असेही म्हटले जाते. पैंजण चांदीचे असून विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत.

७) जोडवी – यास बिछिया असेही म्हटले जाते. करवा चौथला महिला चांदीच्या जोडव्या घालतात.
८) काजळ – डोळ्यांचे काजळ वाढवण्यासाठी विविध स्वरुपात बाजारात काजळ उपलब्ध आहेत. काजळ वाईट नजरेपासून बचाव करते, असे म्हटले जाते.
९) कंबरपट्टा – यास कमरपट्टा असेही म्हणतात. कमरपट्टा स्त्रियांचा एक कंबरेस बांधण्याचा सोन्याचा अलंकार आहे. हा सोने किंवा चांदीचा असतो. आता कमरपट्टा मोत्यांचा, स्टोनमध्ये उपलब्ध आहे.
१०) बाजूबंद – साडी असो वा लेहेंगा बाजूबंद दागिना हाताचे सौंदर्य वाढवतो.
११) झुमके – दागिन्यांसोबत सौंदर्य वाढवणारे कानातील झुमके होय. स्टोन, मोती, ऑक्साईड आणि सोन्या-चांदीच्या दांगिन्यांमध्ये झुमके मिळतात. यास कुंडल किंवा बाली असेही म्हणतात.

१२) गजरा- केसात गजारा किंवा फुले माळाली जातात. सुगंधासाठी किंवा सुंदरतेसाठी वेणीमध्ये किंवा कसांच्या अंबाड्यामध्ये गजरा माळला जातो.
१३) मांग टिका – हा केसांत घालण्याचा एक दागिना आहे. खासकरून लेहेंग्यावर हा दागिना वापरला जातो. शालीनता आणि वैभवाचे हे प्रतीक मानले जाते.

१४) नथ – करवा चौथला एखाद्या वधूप्रमाणे सजले जाते. यामध्ये नथ हा महत्त्वाचा दागिना आहे. याला नथनी अशेही म्हणताता. यादिवशी नाकात चांदीची तार घातली जाते.
१५) बांगड्या – लाल जोड्यावर गोल्डन, रेड, क्रिम किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात. लाल रंग आनंदाचा आणि हिरवा रंग समृद्धीचा मानला जातो.
१६) आलता – यास महावर असेही म्हटले जाते. खासकरून बंगाली स्त्रिया आलता लावताना दिसतात. आलता पायांना लावले जाते. ज्यामुळे पायांचे सौंदर्य आणखी खुलते. आलता गडद लाल रंगाचे असते. (16 Shringar List For Karwa Chouth )
The post करवा चौथसाठी १६ शृंगार, मंगल दिनी सजून-धजून व्हा तयार! appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : करवा चौथच्याया मंगल दिनी स्त्रियांचे सजणे-धजणे आलेच. या शुभ दिनासाठी १६ शृंगाराची यादी देत आहोत. जे करवा चौथसाठी खूप पवित्र मानले गेले आहे. (16 Shringar List For Karwa Chouth) यामध्ये स्त्रियांच्या पोषाखापासून ते दागिन्यांपर्यंत शृंगारासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी आहे. संबंधित बातम्या :  Karwa Chauth ad : समलैंगिक जोडप्याचं ‘करवा चौथ’, ‘त्या’ …

The post करवा चौथसाठी १६ शृंगार, मंगल दिनी सजून-धजून व्हा तयार! appeared first on पुढारी.

Go to Source