जगातील सर्वात महागडे हॉटेल

जगातील सर्वात महागडे हॉटेल

दुबई : जगभरात अनेक आलिशान हॉटेल पाहायला मिळतात. तेथील सूटचे भाडेही चर्चेचा विषय असते. आता बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अलाना पांडेने इंस्टाग्रामवरून एका आलिशान हॉटेलचा व्हिडीओ शेअर केला आहे. दुबईमध्ये असलेले हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे. या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे तब्बल 83,00,000 रुपये इतके आहे. जाणून घेऊया या हॉटेलमध्ये असं आहे तरी काय?
‘अटलांटिस द रॉयल’ असे या हॉटेलचे नाव आहे. या हॉटेलमध्ये अनेक लक्झरी सुविधा आहेत. त्यामध्ये 360 अंशाचा ‘व्ह्यू’ असलेला प्रायव्हेट डेक, टेम्परेचर-कंट्रोल्ड इन्फिनिटी पूल अशा अनेक सोयीसुविधा येथे मिळतात. मूव्ही थिएटर, लायब्ररी, ऑफिस तसेच अन्यही अनेक सुविधा येथे ग्राहकांना मिळतात. इन डोअर आणि आऊट डोअर किचन तसेच 12 लोकांसाठी डायनिंग टेबलची व्यवस्था आहे. एका सूटमध्ये चार बेडरूम, चार बाथरूम आहेत. त्यामुळेच ‘अटलांटिस द रॉयल’ हे जगातील सर्वात महागडे हॉटेल ठरले आहे.
The post जगातील सर्वात महागडे हॉटेल appeared first on पुढारी.

दुबई : जगभरात अनेक आलिशान हॉटेल पाहायला मिळतात. तेथील सूटचे भाडेही चर्चेचा विषय असते. आता बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अलाना पांडेने इंस्टाग्रामवरून एका आलिशान हॉटेलचा व्हिडीओ शेअर केला आहे. दुबईमध्ये असलेले हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे. या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे तब्बल 83,00,000 रुपये इतके आहे. जाणून घेऊया …

The post जगातील सर्वात महागडे हॉटेल appeared first on पुढारी.

Go to Source