इस्त्रालय सैन्याचा राफावर पुन्हा हल्ला; २५ ठार, ५० जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  इस्रायल सैन्याने शुक्रवारी (दि.२१) राफाच्या उत्तरेकडे विस्थापित पॅलेस्टिनींसाठी उभा केलेल्या तंबूच्या छावण्यांवर गोळीबार केला.  गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आणि आपत्कालीन कामगारांच्या म्हणण्यानुसार, या गोळीबारात किमान २५ लोक ठार झाले आहेत तर ५० लोक जखमी झाले आहेत. Israel-Gaza war: इस्त्रालयचा रफाहजवळील तंबुवर हल्ला; २५ ठार, ५० जखमी रफाहमधील  नागरी संरक्षणाच्या प्रथम प्रतिसादकर्त्यांचे प्रवक्ते …

इस्त्रालय सैन्याचा राफावर पुन्हा हल्ला; २५ ठार, ५० जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  इस्रायल सैन्याने शुक्रवारी (दि.२१) राफाच्या उत्तरेकडे विस्थापित पॅलेस्टिनींसाठी उभा केलेल्या तंबूच्या छावण्यांवर गोळीबार केला.  गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आणि आपत्कालीन कामगारांच्या म्हणण्यानुसार, या गोळीबारात किमान २५ लोक ठार झाले आहेत तर ५० लोक जखमी झाले आहेत. Israel-Gaza war:
इस्त्रालयचा रफाहजवळील तंबुवर हल्ला; २५ ठार, ५० जखमी
रफाहमधील  नागरी संरक्षणाच्या प्रथम प्रतिसादकर्त्यांचे प्रवक्ते अहमद रदवान यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हल्ला पाहणाऱ्यांनी बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना सांगितले की, तटीय भागात दोन ठिकाणी गोळीबार झाला आहे. युनायटेड नेशन्सचे म्हणणे आहे की गाझामधील कोणतीही जागा सुरक्षित नाही आणि मानवतावादी परिस्थिती गंभीर आहे कारण कुटुंबाना पुरेसे अन्न, पाणी किंवा वैद्यकीय पुरवठा नाही आहे. तरीही तंबू आणि अरुंद अपार्टमेंटमध्ये आश्रय घेत आहेत.
अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने गाझा सिटी नगरपालिकेच्या गॅरेजवर आणि शहरातील पाच मजली इमारतीवर बॉम्बफेक केली,  यापूर्वी, गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलच्या सैन्याने गेल्या २४ तासांत किमान ३५ पॅलेस्टिनींना ठार केले, ज्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील मृतांची संख्या ३७,४३१ वर पोहोचली आहे.
हेही वाचा

रशिया, उत्तर कोरियाची ‘दिल, दोस्ती’: पुतिन यांच्याकडून किम जोंगना शस्त्रसज्ज कार भेट