ठाणे : अर्जुन टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरील लॅबोरेटरीला आग

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील गोखले रोड, नौपाडा परिसरात असलेल्या अर्जुन टॉवर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रेड क्लिप एक्सेल लॅबोरेटरीला शनिवारी (दि.२२) सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण लॅबोरेटरी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. ही लॅबोरेटरी डॉ. स्वरूप कुलकर्णी यांच्या मालकीची असून …

ठाणे : अर्जुन टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरील लॅबोरेटरीला आग

ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाण्यातील गोखले रोड, नौपाडा परिसरात असलेल्या अर्जुन टॉवर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रेड क्लिप एक्सेल लॅबोरेटरीला शनिवारी (दि.२२) सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण लॅबोरेटरी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली.
ही लॅबोरेटरी डॉ. स्वरूप कुलकर्णी यांच्या मालकीची असून नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तीन फायर वाहन, एक जम्बो वॉटर टँकर, दोन वॉटर टँकर, एक रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन पथक, आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, महानगर गॅस कर्मचारी उपस्थित होते. सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

Maharashtra: Fire breaks out in Thane’s Arjun Tower; dousing operations underway
Read @ANI Story | https://t.co/7PSf2nF9Uc#fire #Maharastra #Thane #Arjuntower pic.twitter.com/z1OMb7JH3Z
— ANI Digital (@ani_digital) June 22, 2024

हेही वाचा : 

कल्याण: दुर्गाडी किल्ल्याच्या बुरूजाचा भाग ढासळला
डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीत पुन्हा आग