लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवीन लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवीन लष्करप्रमुख

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तशी घोषणा केली असून, द्विवेदी हे ३० जून रोजी पदभार स्वीकारतील. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे याच दिवशी निवृत्त होत आहेत.
द्विवेदी सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दहशतवादविरोधी मोहिमा राबविल्या आहेत. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
हेही वाचा : 

जम्मूमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला
महागाई, बेरोजगारीवर होणार संशोधन