कोल्हापूर : आजारास कंटाळून शिरगावातील महिलेने संपवली जीवनयात्रा

कोल्हापूर : आजारास कंटाळून शिरगावातील महिलेने संपवली जीवनयात्रा

विशाळगड; Bharat Live News Media वृत्तसेवा : कित्येक वर्षे उपचार घेऊनही आजाराच्या त्रासापासून सुटका होत नसल्याने शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी (दि.११) घडली असून या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. संगीता पांडुरंग जगताप (वय ५२, रा शिरगाव, ता शाहूवाडी) असे या मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शिरगाव येथील संगीता जगताप यांना गुडघेदुखीचा त्रास होता. बऱ्याच दिवसापासून उपचार घेऊनही त्याचा गुडघेदुखीचा त्रास कमी होत नव्हता. या आजाराला कंटाळून घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आज आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास शाहुवाडी पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :

पुणे : चक्रपाणी वसाहत येथे डबक्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू
परभणी: मानवत येथे भरधाव कारच्या धडकेत वृद्ध ठार
नागपूर : दारूच्या नशेत बायकोला अपशब्द, मित्राचा खून