मानसिक तणावातून अभिनेत्री नूर मालविका दासने जीवन संपवले

मानसिक तणावातून अभिनेत्री नूर मालविका दासने जीवन संपवले

मुंबई : विविध चित्रपट व वेबसीरिजमध्ये झळकलेली ३२ वर्षीय अभिनेत्री नूर मालविका दास हिने अंधेरीतील लोखंडवाला संकुल परिसरातील राहत्या घरात आपले जीवन संपवले. मानसिक तणावातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. चार दिवसांपूर्वी तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती ओशिवरा पोलिसांना दिली होती. तिचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत सापडला. नूर ही फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती.