रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्रिपद

रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्रिपद

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – खानदेशामधील जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या रक्षा खडसे यांनी मंगळवार (दि.११) रोजी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री असलेल्या रक्षा निखिल खडसे यांनी क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पदभार घेतल्यानंतर ट्विट करून याबाबत माहिती दिली.
https://x.com/khadseraksha/status/1800439940045824326?t=PJKnD40LYRUJUY3CUybUgg&s=19
एक्सवर शेयर केलेल्या पोस्टवर त्या म्हणतात की, आनंद आणि जबाबदारीच्या भावनेने मी राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक क्रीडा शक्ती केंद्र बनवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच यावेळी ही जबाबदारी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी आज मंगळवार (दि.११) रोजी ह्याच मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्याबद्दल मी शुभेच्छा देऊन त्यांचेही अभिनंदन करते असे त्या म्हणाल्या.