‘मिर्जापूर सीजन ३’ च्या टीजरने फॅन्स नाराज? ‘मुन्ना भैया’ला शोधत राहिले लोक

‘मिर्जापूर सीजन ३’ च्या टीजरने फॅन्स नाराज? ‘मुन्ना भैया’ला शोधत राहिले लोक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘मिर्जापूर’च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा लोक करत आहेत. फॅन्सना आज मंगळवारी दोन दोन खुशखबरी मिळाल्या आहेत. एकीकडे याची रिलीज डेट समोर आली आहे तर ‘मिर्जापूर ३’ चा टीजर देखील रिलीज झाला आहे. आता या टीझरमध्ये लोक मुन्ना भैय्याला शोधत आहेत. ट्विटरवर #Mirzapur Season 3 ट्रेंड होत आहे.
अधिक वाचा –

अब्दू रोजिकचं लग्न ढकललं पुढे; जाणून घ्या कारण…

तिसऱ्या सीजनच्या टीजरची काही झलक कुलभूषण खरबंदा म्हमजेच बाऊजीच्या दमदार आवाजात ऐकू येते. टीजरची सुरुवात बाऊजी म्हणताना दिसतात की, ‘एक बलवान नर और एक चुस्त मादा जब शिकार पर जाते हैं तो उससे जंगल अक्सर दहल जाता है। पर जंगल की जंग में शेरों का सामना सवा शेरों से होता है और जंगली बिल्लियां चालाक लोमड़ियों का रास्ता काट देती हैं। तूफानी चीते बड़ी रफ्तार से घात तो लगाते हैं पर बेरहम शेरनी के नुकीले पंजों से मात खा जाते हैं। जब खरगोश छटपटाने लगे, लकडबग्घा लडखडाने लगे, गीदड भभकियाने लगे और घडियाल आंसू बहाने लगे तो समझो घायल शेर लौट आया है।’
अधिक वाचा –

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात काय असणार ड्रेस कोड?

मुळचा मुन्ना भैय्या मिर्जापूरमध्ये दिसणार नाही’
या चित्रपटाचा टीजर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अनेक नेटकरी एकच गोष्ट विचारत आहेत की, मुन्ना भैय्या कुठे आहे? विना मुन्ना भैय्या मिर्जापूर आता तसा दिसणार नाही. तर काही लोकांनी घोषणादेखील दिल्या की, मुन्ना भैया अमर रहे.
अधिक वाचा –

दीपिका पादुकोणचा शानदार अंदाज; ‘कल्कि 2898 AD’चं पोस्टर रिलीज

सर्वांचे लक्ष मिर्जापूरच्या सिंहासनावर
सीजन ३ मध्ये सर्वांच्या नजरा एकाच ठिकाणी टिकून आहेत. मिर्जापूरच्या काल्पनिक जगाच्या सिंहासनावर कोण बसेल, मोठा प्रश्न हा आहे की, काय सत्ता आणि आपला दबदबा कायम ठेवण्याच्या लढाईमध्ये मिर्जापूरची गादी मिळेल वा हिसकावून घेतली जाईल.