खासदार झाले, अडचणीत सापडले! पप्पू यादवांवर खंडणीचा गुन्हा

खासदार झाले, अडचणीत सापडले! पप्पू यादवांवर खंडणीचा गुन्हा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पूर्णियाचे नवनिर्वाचित खासदार राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध मुफसिल पोलिस ठाण्यात १ कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये अमित यादव यांचेही नाव असून ते खासदाराचे जवळचे सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पप्पू यादवांवर खंडणीचा गुन्हा कोणी दाखल केला?

पूर्णिया येथील एका फर्नीचर व्यावसायिकाकडे १ कोटीच्या खंडणीची मागणी
१ कोटी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली
2023 मध्ये 15 लाख रुपये आणि दोन सोफा सेटची मागणी
मुफसिल पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

शहराच्या बायपासवर असलेल्या माँ फर्निचरच्या मालकाने या प्रकरणी फिर्याद दिली होती. यादव यांनी मला १ कोटी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
2021 मध्ये त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितली होती.
मालकाने 2021 आणि 2023 मध्ये खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. पहिल्यांदा 2 एप्रिल 2021 रोजी स्वतः विद्यमान खासदाराने त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितली होती. त्याचप्रमाणे 2023 मध्ये दुर्गापूजेदरम्यान मोबाईल आणि व्हॉट्सॲप कॉलवर 15 लाख रुपये आणि दोन सोफा सेटची मागणी करण्यात आली होती. यावेळी शिवीगाळ आणि धमक्याही देण्यात आल्या होत्या, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान, 6 एप्रिल 2024 रोजी खासदार पप्पू यादव यांचे जवळचे मित्र आणि मधेपुरा येथील रहिवासी अमित यादव यांनी त्यांच्या मोबाईलवर सुमारे 10 ते 15 कॉल करून खासदार कार्यालय व निवासस्थान गाठले आणि 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. येथे 4 जून रोजी 9990002432 या मोबाईल क्रमांकावरून फर्निचर व्यावसायिकाला फोन करून पाच वर्षे पूर्णियात राहायचे असेल. तर एक कोटी भरावे लागतील, अशी धमकी देण्यात आली.
हेही वाचा 

लालू-पप्पू यादव यांच्यातील हाडवैरामुळे पूर्णियाची देशभर चर्चा
पप्पू ते राजकुमार..! : विराेधकांनी हिणवले;पण राहुल गांधींनी नेतृत्त्‍व सिद्ध केलेच
बिहारमध्ये ‘एनडीए’पुढे विरोधक भुईसपाट