तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करण्याऱ्या डॉ. अशोक बागुलांना काही तासांतच जामीन !

तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करण्याऱ्या डॉ. अशोक बागुलांना काही तासांतच जामीन !

भंडारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्या वर्दीचा गैरफायदा घेत न्याय मागण्यासाठी आलेल्या तरुणीकडे भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांनी शरीरसुखाची मागणी केली होती. या घटनेनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, या घटनेनंतर अवघ्या काही तासात त्यांना जामीन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या डॉ. अशोक बागुल वैद्यकीय रजेवर असून त्यांचा प्रभार तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव यांना देण्यात आला आहे. भंडारा पोलिस विभागाने डॉ. बागुल यांचा अहवाल नागपूर पोलिस महानिरीक्षकांना पाठविला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केव्हा होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
हे गंभीर प्रकरण उजेडात आल्यानंतर सर्वत्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. बागुल यांना तात्काळ निलंबित करुन बडतर्फ करण्याचीही मागणी लोकांकडून होऊ लागली आहे. सध्या या घटनेचा तपास पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत. तथापि, डॉ. बागुल यांना जामीन मिळाला असला तरी तो रद्द करण्यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी दिली.
जर अशा पध्दतीने जनतेचे रक्षक जनतेचेच भक्षक झाले तर जनतेनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद कुणाकडे मागायची? असे अनेक प्रश्न देखील जनतेपुढे निर्माण झाले आहेत. अशा जनतेचे भक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई करुन सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करावे, अशा आशयाचे निवेदन भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांना दिले आहे.
हेही वाचा :

संतापजनक! रक्षकच बनले भक्षक; पोलिसाने केली तरुणीकडे शरीरसुखाची मागणी
‘आप’ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा : पक्ष कार्यालयाबाबत दिला ‘हा’ निर्णय
पुणे : भीमा नदीवरील पुलाचा पिलर कोसळला